India Languages, asked by sanskruti594, 5 months ago

माझा आवडता संत निबंध​

Answers

Answered by goresunil
20

संत तुकाराम हे इ.स.च्या सतराव्या शतकातील एक वारकरी संत होते. त्यांचा जन्म वसंत पंचमीला-माघ शुद्ध पंचमीला झाला. पंढरपूरचा विठ्ठल वा विठोबा हे तुकारामांचे आराध्यदैवत होते. तुकारामांना वारकरी 'जगद्‌गुरु ' म्हणून ओळखतात. वारकरी संप्रदायातल्या प्रवचन व कीर्तनाच्या शेवटी - ' पुंडलीक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय' असा जयघोष करतात.जगद्गुरु तुकाराम लोककवी होते. जे का रंजले गांजले! त्यासी म्हणे जो आपुले तोचि साधू ओळखावा! देव तेथेची जाणावा! अशा प्रकारचे अभंग संत तुकाराम महाराजांनी जनसामान्यांना सांगून ईश्वर भक्तीचा सुगम असा मार्ग दाखवला. वारकरी संप्रदायाची एक अखंड परंपरा त्यांनी निर्माण केली. सतराव्या शतकामध्ये सामाजिक प्रबोधनाचे मुहूर्तमेढ रोवणारे सुधारक संत म्हणून तुकाराम महाराजांचा उल्लेख करावा लागेल. तुकाराम महाराज वास्तववादी निर्भीड आणि वेळप्रसंगी समाजातील दांभिकपणावर रोखठोक शब्दांमध्ये प्रहार करणारे संत होते. महाराष्ट्राच्या भूमीमध्ये या काळात अनागोंदी निर्माण झालेली होती. अशा काळामध्ये संत तुकारामांनी समाजाला अचूक मार्गदर्शन करण्याचे काम आपल्या साहित्यातून व कीर्तनांतून केले.

तुकाराम महाराज हे साक्षात्कारी व निर्भीड संत कवी होते. विशिष्ट वर्गाची पारंपरिक मक्तेदारी असलेला वेदान्त तुकोबांच्या अभंगवाणीतून सामान्य जनांपर्यंत प्रवाहित झाला. ‘अभंग म्हटला की तो फक्त तुकारामाचाच' एवढी लोकप्रियता त्यांच्या अभंगांना मिळाली. संत तुकारामांची भावकविता म्हणजे अभंग, हे अभंग महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे महान द्योतक आहेत. वारकरी, ईश्र्वरभक्त, साहित्यिक, अभ्यासक व सामान्य रसिक आजही त्यांच्या अभंगांचा अभ्यास करतात. त्यांचे अभंग खेड्यांतील अशिक्षित लोकांच्याही नित्य पाठांत आहेत.

भागवत धर्माचा कळस होण्याचे महद्‌भाग्य त्यांना लाभले. महाराष्ट्राच्या हृदयात अभंगरूपाने ते स्थिरावले आहेत. त्यांच्या अभंगांत परतत्त्वाचा स्पर्श आहे. मंत्रांचे पावित्र्य शब्दकळेत पाझरते.त् यांची प्रत्यक्षानुभूती त्यांच्या भावकाव्यात आहे. त्यांच्या काव्यातील गोडवा व भाषेची रसाळता अतुलनीय आहे.संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगलेखनाबरोबरच गवळणीही रचल्या.

Answered by junali007
10

Explanation:

संत तुकाराम महाराजांच्या घरात पिढ्यान्पिढ्यांची विठ्ठलभक्तीची परंपरा होती. त्यांचे एक पूर्वज विश्वंभर यांना शेतात विठ्ठल-रखुमाईची मूर्ती सापडली. त्यांनी नदीकाठावरील घरात त्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. या घराला 'देऊळवाडा' असे म्हणत. या देऊळवाड्यात चालणारी भजने, कीर्तने, पुराणे ऐकून लहान वयातच तुकाराम महाराजांच्या मनावर आध्यात्मिक विदयेचे खोलवर संस्कार झाले.

संत तुकाराम महाराजांच्या घरात पिढ्यान्पिढ्यांची विठ्ठलभक्तीची परंपरा होती. त्यांचे एक पूर्वज विश्वंभर यांना शेतात विठ्ठल-रखुमाईची मूर्ती सापडली. त्यांनी नदीकाठावरील घरात त्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. या घराला 'देऊळवाडा' असे म्हणत. या देऊळवाड्यात चालणारी भजने, कीर्तने, पुराणे ऐकून लहान वयातच तुकाराम महाराजांच्या मनावर आध्यात्मिक विदयेचे खोलवर संस्कार झाले.त्या काळात महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडला. असंख्य माणसे देशोधडीला लागली. कित्येक मृत्युमुखी पडली. तुकाराम महाराजांवर नातेवाइकांचेही  मृत्यू पाहण्याचे दुर्भाग्य ओढवले. त्या भीषण दुष्काळाने माणसांची केलेली दैना पाहून तुकाराम महाराजांच्या मनात विरक्ती दाटून आली. लहानपणापासून अध्यात्मविदयेचे संस्कार जागृत झाले. त्यांचे मन अध्यात्मचिंतनात गढू लागले. ते देहूजवळच्या भामनाथगडावर जाऊन अध्यात्मचिंतन करू लागले. 

.................................. ......................

Similar questions