India Languages, asked by pinak10, 10 months ago

मा‌‌‌‌‌‌झा आवडता संत speech in marathi

Answers

Answered by sgaikhzara
2

Answer:

जन्म : १२७५

मृत्यू :१२९६

हे १३ व्या शतकातील प्रसिद्ध मराठी संत आणि कवी आहेत. संत ज्ञानेश्वरांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातीलपैठण जवळील आपेगांव येथे झाला. सामान्य लोकांना भगवद्गीता समजण्यासाठी ज्ञानेश्वरांनी भावार्थदीपिका या नावाने भगवद्गीतेवर निरूपण/भाषांतर केले. ते ज्ञानेश्वरी या नावाने प्रसिद्ध आहे. भावार्थदीपिका हे भाषांतराचे कार्य ज्ञानेश्वरांनी अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथे केले.ज्ञानेश्वरांनी भगवद्‍गीतेतील विचार-तत्त्वज्ञान सामान्य माणसांना कळावेत म्हणून ‘भावार्थ दीपिका’ म्हणजेच ज्ञानेश्वरी किंवा ज्ञानदेवी हा ग्रंथ मराठीत लिहिला. कृष्णाच्या अवस्थेचे ज्ञानेश्वरांनी नाट्यमय वर्णन केले आहे. तद्कालीन समाजाने त्यांचा अतिशय छळ करुनही त्या दुःखाचे दर्शन त्यांनी आपल्या लेखनात कुठेच घडविले नाही हे त्यांचे मोठेपण होय.

hope it will help you

follow me on instagram shsikh_naba1234

Answered by ItsShree44
2

Answer:

प्रयत्ने मानव होई उन्नत । गावचि नव्हे, हालवी दिक्प्रांत ।' असा प्रयत्नाच महिमा वर्णन करणारे संत तुकडोजी महाराज हे विदर्भातील यावली गावचे सुपुत्र, त्यांचा जन्य १९०९ मध्ये झाला. त्यांचे कुलदैवत पंढरपूरचा विठोबा असल्याने त्यांच्या घरात विठ्ठलभक्ती, ज्ञानेश्वर-तुकाराम भक्तीदेखील रुजली होती. तुकडोजींचे नाव माणिक बंडोजी ठाकूर. या माणिकने तिसरीतच शाळा सोडून दिली आणि तो ध्यान, भजन-पूजन यांत रंगून गेला. तो नेहमी तुकोबाचे अभंग म्हणत असे. एकदा हा माणिक आपल्या आजोळी गेला असताना, त्याचे गुरू आडकुजी महाराज त्याला म्हणाले, ""तुका म्हणे' असे किती दिवस म्हणशील?

'तुकड्या म्हणे' असे म्हणत जा.' तेव्हापासून गुरुजींच्या आज्ञेनुसार माणिक 'तुकड्या म्हणे' या नाम-पदाने संपणारे अभंग रचू लागला. लोक त्याला 'तुकडोजी महाराज' म्हणून ओळखू लागले. पुढे तुकडोजी महाराजांनी विपुल रचना केली. त्यांची चाळीस पुस्तके प्रसिद्ध आहेत.

शिवाय ४१ अध्यायांचे ४,६७५ ओव्या असलेले 'ग्रामगीता' हे काव्य त्यांनी रचले. ते हिंदी व मराठी अशा दोन्ही भाषांत काव्यरचना करत. ईश्वरभक्ती, सद्गुणांचा उपदेश, सामाजिक जागृती इत्यादी विषयांवर ते कीर्तने करत गावोगाव हिंडत. आपल्या कीर्तनात ते स्वरचित गीते खंजिरीच्या साथीवर म्हणत असत. लोकांनी त्यांना 'राष्ट्रसंत' म्हणून गौरवले. आपले कीर्तन, आपली खंजिरी यांचा उपयोग तुकडोजी महाराजांनी समाजसेवेसाठी केला. समाजात परंपरेने आलेल्या अनिष्ट रूढी, जाति-धर्म-पंथभेद, अंधश्रद्धा या गोष्टींवर संत तुकडोजी महाराज यांनी आपल्या अमोघ वाणीने घणाघाती हल्ला केला. ईश्वराचे विशुद्ध स्वरूप त्यांनी लोकांपुढे ठेवले. त्यामुळे सर्व धर्माचे लोक त्यांचे अनुयायी झाले. लौकिक जीवन चांगल्या त-हेने जगावे, असे त्यांचे सांगणे असे. म्हणून आपल्या कीर्तनातून ते १९३० साली तुकडोजी महाराजांचा महात्मा गांधीजींशी संपर्क आला आणि त्यांनी राष्ट्रकार्यात भाग घेण्यास सुरुवात केली. १९४२ च्या आंदोलनात भाग घेतल्यामुळे त्यांना कारावासही भोगावा लागला. स्वातंत्र्यानंतर त्यांनी स्वतःला भूदान, जातिनिर्मूलन इत्यादी कामांना वाहून घेतले. विश्वधर्म व विश्वशांती परिषदेसाठी ते जपानलाही गेले होते. कार्याची परंपरा अखंडपणे चालू आहे. व्यायामाचा प्रचार करत.

Similar questions