India Languages, asked by Rohit7501, 1 month ago

माझा आवडता सण गुढीपाडवा
essay writing​

Answers

Answered by richakish
5

Answer:

गुढीपाडवा म्हणजे आपल्या मराठी माणसांचा सण जो आपण भारतीय लोकं मराठी नववर्षाच्या निमित्ताने साजरा करतो.

1 जानेवारी रोजी नवीन वर्ष साजरा करतात परंतु ते इंग्रजांनी आणले आहे आणि आपले नवे वर्ष खरे चैत्र महिन्यात येणाऱ्या गुढी पाडव्याला सुरू होते. त्यामुळे आपले नविन वर्ष फक्त गुढीपाडव्यालाच.

गुढीपाडवा का साजरा करतात त्यामागे काही कथा आहेत त्यापैकी एक कथा अशी आहे की ब्रह्म देवाने ह्या दिवशी सृष्टी निर्माण केली होती. आणि अजून कथा म्हणजे ह्या दिवशी देव रामाने रावणाचा वध करून, सिते मातेला सोडवून आणि 14 वर्षाचा वनवास समाप्त करून परत अयोध्येला आले होते. तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी लोकांनी त्या आनंदात गुढी उभारली होती. अश्या ह्या दोन कथा आहेत ज्यामुळे गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो.

गुढपाडव्याच्या दिवशी सर्वजण सकाळी लवकर उठून अंघोळ करतात आणि आपल्या घराच्या बाहेर वट्यावर किंवा छतावर गुढी उभी करतात. गुढी उभारण्यासाठी एक लांब बांबूची काठी घेतात त्या काठीच्या वरच्या टोकाला साडी, कडुलिंबाची पाने, आंब्याची पाने आणि साखरीची गाठी, फुलांची माळ असे बांधून त्यावर तांब्याचा गडू ठेऊन गुढी उभी करतात. ह्या गुढीला गोड साखरेचा म्हणजेच पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. संध्याकाळी ही गुढी खाली उतरवली जाते. आमच्या घरात मी आणि माझे बाबा आम्ही दोघी गुढी उभी करतो त्यात मी बाबांना मदत करतो.

गुढीपाडव्याला पुरण पोळीचा नैवेद्य केला जातो कारण नव वर्षाच्या आनंदात सर्वजण गोडधोड पदार्थ करतात. आमच्याही घरात आई सकाळमध्ये स्वयंपाकाला लागून जाते त्यात पुरणपोळी, आमटी, भात, तळण असे करते. मीही आईला त्यात मदत करतो.

ह्या सणाला हिंदू धर्मात शुभ दिवस मानला जातो कारण वेदांग ज्योतिष शास्त्रानुसार साडेतीन मुहूर्तांपैकी गुढीपाडवा एक मुहूर्त असतो. गुडी ही सुख समृद्धीची प्रतीक असते आणि घरातील शांतता, सुख, समृद्धी, धन असेच टिकून राहावे याचे ते प्रतिक असते. गुढीपाडवा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असल्यामुळे ह्या दिवशी लोक खरेदी करतात जसे नवे कपडे, दागिने, इतर गोष्टी. असे मानतात की ह्या दिवशी खरेदी करणे हे शुभ असते.

वैज्ञानिकदृष्ट्या बघितले तर हा सण खूप उपयोगी आहे कारण ह्या दिवशी कडुलिंबाचा उपयोग केला जातो. आणि जर ह्या ऋतुंमध्ये जर कडुलिंबाची पाने खाल्ली तर शरीरातील उष्णता कमी होते आणि त्याचरोबर इतर रोग ही कमी होतात. कारण आपण सर्वांना माहितीच असेल की कडुलिंब हे एक औषधी वनस्पती आहे.

आपण जर महाराष्ट्रात बघितले तर हा सण घरोघरी साजरा केला जातो आणि घरोघरी आपल्याला गुढी उभारलेली दिसेल. महाराष्ट्रात अधिक मराठी माणसे राहतात आणि सण मराठी माणसांचा सण म्हणून जास्त ओळखला जातो.

मला ह्या दिवशी शाळेला सुट्टी असते आणि त्यादिवशी आमच्या घरात, घरात काय पूर्ण गल्लितच प्रसन्न वातावरण असते. कारण सर्वजण सकाळी लवकर उठून तयार झालेले असतात सर्वांच्या घरात पूजा पाठेचा सुगंध, पुरणपोळीचा सुगंध आणि घराच्या बाहेर छान गुडी उभी केलेली असते.

असा हा सण मला खूप आवडतो आणि खूप प्रसन्न वातावरण वाटते. आमच्या घरात हा सण आनंदाने साजरा केला जातो.

Similar questions