India Languages, asked by TransitionState, 1 year ago

माझा आवडता सण – गणपती, गणेशोत्सव, गणेश चतुर्थी- मराठी...

Answers

Answered by halamadrid
83

Answer:

माझा आवडता सण आहे गणेशोत्सव. हा एक अत्यंत लोकप्रिय सण आहे.हा सण भाद्रपद महिन्यात येतो.याला गणेशचतुर्थी असेही म्हणतात.लोक धूमधडाक्यात हा उत्सव साजरा करतात.

गणेशचतुर्थीसाठी लोक घरात छान सजावट करतात.या दिवशी भक्तिभावाने गणेशाची मूर्ती आणतात.रोज सकाळी आणि संध्याकाळी गणेशाची आरती करतात.आरतीसाठी सगळेजण एकत्र येतात.आरतीनंतर प्रसाद वाटतात.घर प्रसन्नतेने भरून जाते.

गणेशोत्सव गल्लीत व विभागातही साजरा करतात.त्याला सार्वजनिक गणेशोत्सव म्हणतात.लोकमान्य टिळकांनी लोकांमध्ये एकता वाढावी म्हणून सार्वजनिक गणेशोत्सव सुरु केले होते.सार्वजनिक गणेशोत्सवात रोज मनोरंजनाचे कार्यक्रम असतात.सर्वत्र उत्साह असतो.लोक दीड,पाच,सात,दहा किंवा अकरा दिवसांमध्ये गणेशमूर्तीचे विसर्जन करतात.भक्तिभावाने हा सण साजरा केला जातो.

Explanation:

Answered by satishthombre70
23

Answer:

गणपती म्हटलं कि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे, किती दिवस सुट्टी आहे. शालेय विद्यार्थ्यासाठी गणपतीची सुट्टी म्हणजे पर्वणीच असते. पाऊस नुकताच संपलेला असतो, वातावरण अगदी प्रसन्न, हिरवेगार आणि आल्हाददायक असते. अश्या वातावरणात गणपती बाप्पांच्या आगमनाने सारे वातावरण बहरून येते. प्रत्येक जण आपल्या समस्या, भांडणे विसरून जातात. कळत नकळत सर्वांच्या चेहऱ्यावर एक तेज येत. किती बर होईल जर गणपती बाप्पा वर्षभर राहिले तर, सर्व किती मस्त असेल.

गणपती बाप्पांच्या स्वागतासाठी घरोघरी, सार्वजनिक मंडळांमध्ये मंडप, मखर, पताका बनवण्याची तैयारी सुरु होते. घरातील लहानगी, मोठी अगदी उत्साहाने तयारीला लागतात. या वर्षी कसल्या प्रकारची सजावट करायची, कैलाश पर्वत, गड की आणखी वेगळं काही, ही चर्चा खूप मजेशीर असते. कोणी म्हणत पूर्ण मखर घरी बनवू, कोणी म्हणत बाजारातून विकत आणू. ही हुज्जत ही खूप छान असते.

गणेशाच्या आगमनापूर्वी एक दोन दिवस सगळे घर, अंगण साफ करायला घेतात, घरातील सगळे अगदी उत्साहात यात भाग घेतात. कितीही दिवस अगोदर तयारी केली तरीही जी मजा शेवटच्या रात्री येते ती वेगळीच असते. मखर बनवणे, पताका चिकटवणे, दिवे, पणत्या, समई शोधून स्वच्छ करून ठेवणे, या सर्व धावपळीत ही खूप मजा येते. नातेवाईक सुट्ट्या काढून घरी येतात, आपले चुलत, मावस, आत्ते भाऊ, बहिणी येतात. लहानगी तर कल्ला करतात. मोठयांच्या गप्पा-टप्पा, छोट्यांच्या खोड्या आणि खेळांनी घर, आंगण अगदी प्रसन्न होऊन जाते.

गणेश चतुर्थीच्या दिवशी सगळे लवकर उठतात, फटाफट स्नान करून नवीन कपडे परिधान करतात.आई,आजी प्रसाद, नैवद्य आणि मोदकांच्या तयारीसाठी लागतात. बाबा आणि आम्ही सारी लहानगी गणपती बाप्पाची मूर्ती आणायला जातो. नाचत-वाजवत आम्ही गणपती बाप्पाला घरी घेऊन येतो. अंगणात आल्यावर आई पूजा करते, आरती करते आणि मग गणेश भगवान आपल्या सिंहासनावर आरूढ होतात. थोड्या वेळाने आरती होते, ढोलकी, टाळ, टाळ्यांच्या आवाजाने घर दूम- दूमून जाते. मोदकांचा नैवद्य दाखवला जातो, आरती फिरवली जाते, प्रसाद वाटला जातो. त्यादिवशी दुपारी सर्वजण एकत्र बसून जेवण करतात.

कोणाच्या घरी गणपती बाप्पा दिड दिवस तर कोणाकडे ५, ७ किंवा १० दिवस वास करतात. गणपती बाप्पांसोबत त्यांच्या मातोश्री, गौरी सुद्धा येतात. घरातील स्त्रिया खूप भक्ती भावाने गौरीचे व्रत आणि पूजा करतात. बघता बघता गणपती बाप्पांच्या विसर्जनाचा दिवस उजाडतो. सर्वांनाच माहीत असते की हा दिवस येणार तरीही मन उदास होते. विसर्जनाच्या दिवशी किंवा अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती बाप्पाचे वाजत गाजत विसर्जन केले जाते.

गणेशोत्सव माझा आवडता सण आहे कारण या सणात सर्व घराचे, समाजाचे सदस्य एकत्र येतात. आपले वाद-विवाद, रुसवे-फुगवे विसरून एकत्र गणपतीचा सण साजरा करतात. विविध धर्माचे लोक सुद्धा धार्मिक सीमा पार करून गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेतात. लोकमान्य टिळकांनी ज्या उद्देशाने हा सण चालू केला त्याचे फळ आपण आज पाहू शकतो. भारतात नाना प्रकारचे धर्म,जाती आणि वाद आहेत. देशाच्या उन्नतीसाठी हे सगळे एकत्र आणि आनंदात राहणे खूप गरजेचे आहे. गणेशोत्सव हा सण माझा आवडता सण आहे कारण हा सण घरच्यांना, समाजाला एकत्र आणण्याचे काम करतो.

Similar questions