India Languages, asked by sunitashinde098, 5 months ago

. 'माझे आवडते ठिकाण' या विषयावर खालील मुद्द्यांच्या आधारे निबंध लिहा.
ठिकाणाचे वर्णन-निसर्गसौंदर्य- खादयसंस्कृती-ठिकाण आवडण्याची कारणे​

Answers

Answered by Pikachu453
12

माझे एक काका सावंतवाडीला राहतात. एकदा मे महिन्याच्या सुट्टीत आम्ही काकांकडे गेलो होतो. आम्ही सर्वचजण आल्यामुळे काका आनंदात होते. मोठ्या उत्साहात त्यांनी आम्हांला संपूर्ण सावंतवाडीचे दर्शन घडवले. एके दिवशी त्यांनी आंबोलीला जाण्याचा बेत जाहीर केला आणि आम्हा मुलांमध्ये उत्साहाची लाटच पसरली. वास्तविक मी पूर्वी आंबोली पाहिले आहे. परंतु हे डोंगरमाथ्यावरील सुंदर गाव पुन्हा पाहायला मिळणार, याचा मलाही खूप आनंद झाला होताच.

Tourist Destination essay in marathi

आंबोली हे निसर्गाची कृपा लाभलेले डोंगरमाथ्यावरचे एक छोटेसे गाव आहे. प्रथम आम्ही सावंतवाडीहून गाडीने आंबोलीकडे निघालो, तेव्हा त्या डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या 'दानोली' या गावी पोहोचलो. मग रमतगमत डोंगरमाथ्यावरील आंबोली या गावी पोहोचलो. या आंबोलीला अलीकडे थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्धी मिळू लागल त्याला 'गरिबांचे महाबळेश्वर' म्हणून ओळखतात,

'आंबोली ' या ठिकाणाचा समावेश कोकणातील सिंधदुर्गात केला जातो, अजूनही या ठिकाणाचे शहरीकरण झाले नाही, म्हणून ते घाटमाथ्यावरील एक टुमदार खेडेगावच आह. या घाटमाथ्यावरून सुंदर दृश्ये दिसणारी ठिकाणे आहेत, ते पॉइन्टस म्हणूनच ओळखले जातात. तेथील सूर्यास्त पाहण्यासाठी प्रवासी आवर्जून येतात. या आंबोली गावात अजून दोन प्रेक्षणीय स्थानांचा उल्लेख केला जातो. ती स्थाने म्हणजे 'महादेवगड' आणि 'नारायणगड'. गड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या स्थानांवर गडांच्या कोणत्याही खुणा आज आढळत नाहीत. या गडांच्या आश्रयाने तेथील काही भूमिपुत्रांची वस्ती आहे. अगदी थोड्या पैशात ते भाकरी, पिठले, कढी देऊन आपले स्वागतही छान करतात.

आंबोली घाटाला कोणत्याही काळात पर्यटक भेट देतात, पण खासकरून वर्षा ऋतूत येथील सौंदर्य अनुपम असते. निसर्गराजा प्रसन्न होऊन आपले जलवैभव येथे ओतत असतो आणि शहरातून थकून आलेले पर्यटक या पाण्यात न्हाऊन आपल्या थकव्याला पळवून लावतात. आंबोली-बेळगाव रस्त्यावर थोडी पायपीट केल्यावर हिरण्यकेशी नदीचे उगमस्थान दिसते. येथे पार्वतीदेवीचे मंदिर आहे. ही हिरण्यकेशी नदी म्हणजे भगवान महादेवाने पार्वतीला दिलेली भेट अशी कथा सांगितली जाते. पुढे या नदीला चित्री नावाची नदी मिळते आणि मग या मैत्रिणी हातात हात घालून कर्नाटकाकडे मार्गस्थ होतात. या हिरण्यकेशी नदीवर असलेला नागरतास धबधबा आपल्या डोळ्यांचे पारणे फेडतो.

निसर्गरम्य कोकणातील आंबोलीला आंबा, काजू यांचे वरदान लाभलेले आहेच. पण त्याशिवाय हिरडा, जांभूळ, ऐन, अंजनी इत्यादी औषधी झाडांचे वैभवही प्राप्त झाले आहे. आंबोलीच्या घाटात हिंडताना इतकी रंगीबेरंगी झाडे, पाने, फुले दिसतात की, काय पाहू आणि काय नको असे होते. अजून आंबोली हे एक डोंगरमाथ्यावरील टुमदार खेडे आहे. तेथे पंचतारांकित संस्कृती पोहोचली नाही. त्यामुळे तेथे पुन:पुन्हा जावेसे वाटते.

मित्रांनो तुम्‍हाला मी पाहिलेले पर्यटन स्थळ मराठी निबंध हा निबंध कसा वाटला व पर्यटन स्थळाचा तुमचा अनुभव शेअर करू शकता . धन्‍यवाद

महत्‍वाचे मुद्दे :

(तळटीप : निबंध लिहीताना आपण खालील महत्‍वाचे मुद्दे वापरू शकता. )

आंबोलीला जाण्याचे प्रयोजन

आंबोली - निसर्गाचे वरदान लाभलेले एक छोटेसे गाव

गरिबांचे महाबळेश्वर

सुंदर ठिकाणे

महादेवगड, नारायणगड

मूळ वस्ती

आंबोलीतील नदी

धबधबा

आंबोलीतील झाडे

साधेपणा हाच आगळेपणा.

Answered by nirbhaydhumal25
3

उत्तर:- बाहेर फिरायचे म्हटले की प्रत्येक व्यक्ति तयारच असतो. कारण बाहेर फिरण्यात व विशेषतः सुंदर पर्यटन स्थळांना भेट देण्यात वेगळाच आनंद मिळतो. 

उत्तर:- बाहेर फिरायचे म्हटले की प्रत्येक व्यक्ति तयारच असतो. कारण बाहेर फिरण्यात व विशेषतः सुंदर पर्यटन स्थळांना भेट देण्यात वेगळाच आनंद मिळतो. प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्यात चांगले भोजन, चांगले कपडे आणि चांगल्या चांगल्या ठिकाणी फिरायला जायला आवडते. आणि जर गोष्ट बाहेर फिरण्याची असेल तर व्यक्ती कधीही नाही म्हणत नाही. बाहेर फिरायला प्रत्येकालाच आवडते. आजच्या काळात प्रत्येक जण आपापल्या कामात व्यस्त आहे, बाहेर फिरण्याचा आनंद अनुभवण्यासाठी कोणाकडेही वेळ नाही. पण जर कधी कोणाला आपल्या शहराबाहेर पर्यटन म्हणून जाण्याची संधी मिळाली, तर प्रत्येकालाच आनंद होतो. पर्यटन फिरायला जाण्याने शरीराचा सर्व थकवा निघून जातो व जीवनाचा खरा आनंद अनुभवायला मिळतो. 

उत्तर:- बाहेर फिरायचे म्हटले की प्रत्येक व्यक्ति तयारच असतो. कारण बाहेर फिरण्यात व विशेषतः सुंदर पर्यटन स्थळांना भेट देण्यात वेगळाच आनंद मिळतो. प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्यात चांगले भोजन, चांगले कपडे आणि चांगल्या चांगल्या ठिकाणी फिरायला जायला आवडते. आणि जर गोष्ट बाहेर फिरण्याची असेल तर व्यक्ती कधीही नाही म्हणत नाही. बाहेर फिरायला प्रत्येकालाच आवडते. आजच्या काळात प्रत्येक जण आपापल्या कामात व्यस्त आहे, बाहेर फिरण्याचा आनंद अनुभवण्यासाठी कोणाकडेही वेळ नाही. पण जर कधी कोणाला आपल्या शहराबाहेर पर्यटन म्हणून जाण्याची संधी मिळाली, तर प्रत्येकालाच आनंद होतो. पर्यटन फिरायला जाण्याने शरीराचा सर्व थकवा निघून जातो व जीवनाचा खरा आनंद अनुभवायला मिळतो. आपल्या भारतात अनेक सुंदर पर्यटन स्थळ आहेत जेथे फिरायला जाऊन आपण जीवनाचा खरा आनंद मिळवू शकतो. परंतु मी पाहिलेल्या पर्यटन स्थळांपैकी माझे आवडते ठिकाण कश्मीर आहे. मी यावर्षी माझ्या कुटुंबासोबत काश्मीरला गेलो होतो. जसेही आमच्या गाडीने घाटाच्या सीमेत प्रवेश केला, पृथ्वीच्या या स्वर्ग सौंदर्याला पाहून मी थक्क झालो. कोणीतरी म्हटले आहे की कश्मीर भारताचे स्विजरलैंड आहे. तेथे गेल्यावर मला ही गोष्ट खरी जाणवली, खरोखर काश्मीरच्या घाट जगातील सर्वाधिक मोहक आणि रमणीय स्थळ आहे. हे विशाल स्थान हिमालयाच्या मध्यात स्थित आहे. काश्मीर देवतांचे निवासस्थान आहे, येथे विपुल प्रमाणात फळे-फुले, वनस्पती आणि जीवजंतू आढळतात.

उत्तर:- बाहेर फिरायचे म्हटले की प्रत्येक व्यक्ति तयारच असतो. कारण बाहेर फिरण्यात व विशेषतः सुंदर पर्यटन स्थळांना भेट देण्यात वेगळाच आनंद मिळतो. प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्यात चांगले भोजन, चांगले कपडे आणि चांगल्या चांगल्या ठिकाणी फिरायला जायला आवडते. आणि जर गोष्ट बाहेर फिरण्याची असेल तर व्यक्ती कधीही नाही म्हणत नाही. बाहेर फिरायला प्रत्येकालाच आवडते. आजच्या काळात प्रत्येक जण आपापल्या कामात व्यस्त आहे, बाहेर फिरण्याचा आनंद अनुभवण्यासाठी कोणाकडेही वेळ नाही. पण जर कधी कोणाला आपल्या शहराबाहेर पर्यटन म्हणून जाण्याची संधी मिळाली, तर प्रत्येकालाच आनंद होतो. पर्यटन फिरायला जाण्याने शरीराचा सर्व थकवा निघून जातो व जीवनाचा खरा आनंद अनुभवायला मिळतो. आपल्या भारतात अनेक सुंदर पर्यटन स्थळ आहेत जेथे फिरायला जाऊन आपण जीवनाचा खरा आनंद मिळवू शकतो. परंतु मी पाहिलेल्या पर्यटन स्थळांपैकी माझे आवडते ठिकाण कश्मीर आहे. मी यावर्षी माझ्या कुटुंबासोबत काश्मीरला गेलो होतो. जसेही आमच्या गाडीने घाटाच्या सीमेत प्रवेश केला, पृथ्वीच्या या स्वर्ग सौंदर्याला पाहून मी थक्क झालो. कोणीतरी म्हटले आहे की कश्मीर भारताचे स्विजरलैंड आहे. तेथे गेल्यावर मला ही गोष्ट खरी जाणवली, खरोखर काश्मीरच्या घाट जगातील सर्वाधिक मोहक आणि रमणीय स्थळ आहे. हे विशाल स्थान हिमालयाच्या मध्यात स्थित आहे. काश्मीर देवतांचे निवासस्थान आहे, येथे विपुल प्रमाणात फळे-फुले, वनस्पती आणि जीवजंतू आढळतात.येथील विशाल धबधब्यातून पडणारे पाणी मधुर संगीत निर्माण करते. काश्मीरमधील अमरनाथ ची गुहा प्रसिद्ध आहे. येथे भगवान शंकराचे प्राचीन मंदिर आहे. अमरनाथ मंदिर धरती पासून पंधरा हजार फूट उंचीवर स्थित आहे. याशिवाय काश्मीरमध्ये धार्मिक व ऐतिहासिक महत्त्व असलेले अनेक तीर्थस्थळ आहेत. दरवर्षी हजारो पर्यटन यात्री या प्राचीन व धार्मिक स्थळांची यात्रा करतात. काश्मीर भारतातील सर्वाधिक सुंदर नैसर्गिक स्थळांपैकी एक आहे. काश्मीरचा संपूर्ण घाट रमणीय आहे. म्हणूनच दरवर्षी भारतासह विदेशातून मोठ्या संख्येत पर्यटक येथे येतात.

Similar questions