World Languages, asked by akhileshkanojia70, 8 months ago

माझा आवडता विषय Marathi​

Answers

Answered by Anonymous
5

Answer:

नमस्कार मित्रांनो आपल्या प्रिय असणाऱ्या गोष्टीबद्दल आज आपण परत एक निबंध बघणार आहोत ज्याचे शीर्षक आहे. "माझा आवडता विषय मराठी निबंध ". तसे तर आपल्याच महाराष्ट्रात आपली भाषा मराठीच आहे. याच अनुषंगाने आज आपण बघणार आहोत चला तर मग निबंधाला सुरुवात करुया.

माझा आवडता विषय मराठी निबंध |

माझी मातृभाषा आहे गुजराथी! मी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकते. बहुतेक व्यवहारात हिंदी भाषाच वापरली जाते. तरीपण मला सर्वांत आवडते मराठी भाषा ! अगदी लहानपणी माझी मराठीशी ओळख झाली. माझे आईबाबा दोघेही डॉक्टर असल्यामुळे दिवसभर कामात असत. मला सांभाळायला मैनामावशी आमच्याकडे राहत. माझा दिवस मैनामावशीच्या सहवासात जात असे. तिच्या माझ्याशी सर्व गप्पागोष्टी चालत त्या मराठीत ! त्यामुळे काऊचिऊपासून ज्ञानेश्वर, नामदेवांपर्यंत सर्वांबाबतच्या गोष्टी मी मैनामावशीकडून मराठीत ऐकल्या होत्या.

नवीन पुस्तके आणली की, मराठीचे पाठ्यपुस्तक मी प्रथम वाचून काढते. म्हणून वर्गात शिकताना मला कधीच कंटाळा येत नाही. एखादी कविता मी प्रथम वाचलेली असते, पण बाईंनी तीच कविता शिकवल्यावर मला ती अधिक समजते. पाठ्यपुस्तकातील बहुतेक सगळ्या कविता मला तोंडपाठ आहेत. इतर अनेक मराठी कविता माझ्या पाठ आहेत. त्यांचा मला निबंध लिहिताना उपयोग होतो.

मी मराठी शुद्धलेखन चांगले समजावून घेतले आहे, त्यामुळे माझ्या लेखनात फारशा चुका होत नाहीत. भरपूर वाचन केल्यामुळे मराठी विषयात मला चांगले गुण मिळतात. त्यामुळेही हा माझा आवडता विषय ठरला आहे.

I hope this will help you......

please mark as brainliest......

Answered by anandmestry771
0

Answer:

here is your answer

Explanation:

First read the answer

Mark as BRAINLEST

Attachments:
Similar questions