माझा भारत देश' या विषयावर १० वाक्ये(Sentence) लिहा.
Answers
Explanation:
भारत माझा देश जगातील सर्वात मोठे लोकशाही राज्य आहे. भारताचा इतिहास मोठा रोमांचक व स्फूर्तिदायक आहे. प्राचीन भारतीय संस्कृती ही भारतीयांची सर्वात मोठी ठेव आहे. हजारो वर्षांची तेजस्वी परंपरा तिला लाभली आहे. भारतात बोलल्या जाणाऱ्या विविध भाषा हे भारताचे वैशिष्ट्य आहे. या सार्या भाषा आपापल्या साहित्याने समृद्ध आहेत, हिंदी भारताची राष्ट्रभाषा आहे, तर सत्यमेव जयते हे भारताचे ब्रीदवाक्य आहे. विश्वविजयी तिरंगा असा आमचा राष्ट्रध्वज आहे. जनगणमन हे आमचे राष्ट्रगीत आहे. साऱ्या विश्वाला शांतीचा संदेश देणारे अशोकचक्र ही आमची अस्मिता आहे. अभिनंदन धर्माचे पंथाचे जातीचे कोट्यावधी लोक या देशात गुण्यागोविंदाने राहतात. विविध प्रांत धर्म जाती यांचा रीतिरिवाज आणि सांस्कृतिक अविष्कार आतही भिन्नता आहे. पण या विविधतेतही एकता आहे; कारण आम्ही सर्वजण भारतीय आहोत भारताचा भूगोल हा विविध अपूर्ण आहे. मोसमी वाऱ्यांची वरदान, हिमालयाची मायेची पाखर आणि गंगा, यमुना, कृष्णा, गोदावरी यासारख्या अनेक नद्यांची माया ममता यावर माझी मातृभूमी पोहोचलेली आहे. भारतावर निसर्गाचा तर वरदहस्त आहे. नैसर्गिक सुंदर याची एवढी विविधता जगात कुठेही आढळत नाही.