मी झाड बोलतोय... please ye dona na log
Answers
मी झाड, जन्म दि .--/--/--,, मृत्यू दि.--/--/1910 हो बरोबर वाचलत मृत्यू असच लिहिलंय..!! कारण मी आता जंगलात एका कोपर्यात पडलेलो आहे. थोडक्यात आता माझा आत्मा राहिलाय देह केव्हाच मातीमय झालाय. आश्चर्य वाटलं ना? देह, आत्मा वगरे.?? पण झाड असलो म्हणून काय झालं? मलाही मन आहे भावना आहेत. अरे माणसा एव्हढा हव्यास कसला आहे रे तुला? जंगलच्या जंगल उद्धवस्त केलीस तरीही अजून समाधान होताच नाही तुझा...! आयुष्यभर सगळ्यांना काहीना काही देत आलो. वाऱ्या वादळात डगमगणाऱ्या वेलीला बंधुत्वाच्या नात्याने आधार दिला. अरे लेका तुझा घरी सणासुदीला तिच्यावरच्या वाढलेल्या फुलांचाच हार लावतोस न एक दिवशी अचानक तिचा आधार काढून घेतोस? माझा शरीराचे भाग पडतोस. आणि वापर करतोस तो कश्या साठी तर showpiece साठी?? किमान देव्हार्यासाठी तरी वापरायचस आनंदाने झिजलो असतो. अरे माणसा तुझी छोटीशी लेक जेव्हा फुल काढायला यायची, फुलापर्यंत हात पोहोचला नाही तर हिरमुसून जायची तिचा केविलवाणा चेहरा बघून मी अलगत खाली वाकायचो माझं फुल तुझा फुलाच्या हातापर्यंत पोहोचवायचो पण चुलीसाठी लाकूड हव म्हणून तू माझा हातच तोडलास पण माझा जळण्यान तुझा लेकीला जेवण मिळणारे ह्या विचाराने आनंदाने मी जळलो सांग अरे माणसा कुठे कमी पडलो.? प्रत्यक्ष सदगुरू विसावतो माझा ठाई, तरी म्हणतोस झाडच आहे उगाच ठेऊ कशापाई.!? भर उन्हाळ्यात सुद्धा सावली दिली, तुझा लेकरांच्या पायाला उन्हाचे चटके बसू नयेत म्हणून पानरुपी चादर हन्तरलि. माझी माया तुला कळलीच नाही अंगणात कचरा होतो म्हणून तू मला तोडून टाकलस.. माझासाठी नाही किमान स्वतःच्या.लेकरांसाठी झाड लाव भविष्यात त्यांना श्वास (oxigen) पैशात मोजावा लागू नये.. स्वतः घेतला नाहीसच पण किमान त्यांना तरी घेउदे एकदातरी मोकळा श्वास...!! मोकळा श्वास!!