माझी जंगल सफर निबंध???
Answers
Answer:
सिंहासाठी प्रसिद्ध असणारं गिरच्या राष्ट्रीय उद्यानला भेट देण्याचा योग आला. दोन दिवसांच्या प्रवासानंतर तिसऱ्या दिवशी दुपारी जुनागढ जंक्शनला उतरलो. तिथून बस पकडून ६० किमी प्रवास करून सासण-गिर या गावात पोहोचलो. लागलीच राहण्यासाठी रूम आणि लायन सफारीसाठी बुकींग करून आराम करावा असा विचार करून, मी गिर कार्यालयातील खिडकीवर चौकशीसाठी गेलो. परंतु कार्यालयातील अधिकाऱ्याचं उत्तर ऐकून मी जागीच उडालो. त्यांनी सांगितल की, इथे बुकींग ऑनलाइन होतं. शिवाय संपूर्ण भारतामधून सेमिनारसाठी काही अधिकारी आले आहेत. म्हणून इथे तुमच्या राहण्याची सोय होऊ शकत नाही. काही सुचत नव्हतं कोणीही मदत करण्यास तयार नव्हतं. शेवटी खूप विनवणी केल्यावर एक माणूस मदतीला आला. त्याने तिथे जवळचं असलेल्या परिसरात एका हॉटेलची माहिती दिली. त्या हॉटेलवर माझ्या राहण्याची उत्तम सोय झाली.
दुसऱ्या दिवशी सकाळी गिरचा दुसरा विभाग देवालियाला जाण्यासाठी निघालो. सासण गिर ते देवालिया हे अंतर १३ किमीचे आहे. गिरच्या जंगलात जवळपास ५५० सिंह आणि इतर हरिण, चित्तासारखे प्राणी आहेत. परंतु आपल्या फेरीत ते सगळे प्राणी दिसतीलचं असं नाही, असं मी सहप्रवाशांकडून ऐकलं होतं. त्यामुळे धाकधूक होती. देवालिया पार्कच्या गेटजवळ पोहचणार तितक्यात कंपाऊंडच्या बाजूला सिंहाची जोडी निघताना दिसली. आत प्रवेश केल्यावर खूप काटेरी झुडप नजरेस पडत होती. अचानक १०-१५ हरणांचा कळप बसच्या बाजूने गेला. त्यामुळे सगळे प्रवाशी सुखावले होते. पुढे ठळक ठिपकेवाला चित्ता काटेरी झुडूपात पळताना दिसला. पण हे सर्व पाहिल्यावर जंगलाचा राजा दिसला नव्हता. त्याच्या एका दर्शनासाठी सर्वांच लक्ष लागलं होतं. आमच्या गाडीच्या ड्रायव्हरने वळण घेऊन गाडी थांबवली आणि पहातो तर काय सिंहाचं पूर्ण कुटुंब आमच्या स्वागताला सज्ज होतं. सर्वांचा आनंद गगनात मावत नव्हता. त्यानंतर परतीचा प्रवास सुरू झाला. परतीच्या प्रवासात मी अनेक पक्ष्याचे मनसोक्त फोटो काढले.