India Languages, asked by tsglegend28, 4 months ago

माझा कर्तव्य
niband in marathi ​

Answers

Answered by eshagurav
1

Answer:

मानवी जीवनात तारुण्यही सगळ्यात रोमांचकारी सामर्थ्यशाली व निर्भय बनणारी गोष्ट आहे. बुद्ध दादा धर्माधिकारी यांनी तारुण्याची व्याख्या तेज तप आणि तत्परता ज्या ठिकाणी वास करतात असे व्यक्तिमत्व कशी केली आहे. आजची तरुण पिढी असंतुष्ट आहे. त्यामुळे तो विध्वंसक कार्य करते असा आरोप नेहमीच केला जातो. तरुण हा नेहमीच असंतुष्ट असतो नवे तसा तो असला पाहिजे. मात्र ही संतुष्ट विधायक कार्याच्या कारणी लागली पाहिजे. भूतकाळात डोकावून बघता काही सामान्य व्यक्तीने करण्यातच काही अलौकिक कार्य केलेले दिसून येते. अध्यात्माला संस्कृत भाषेत कोंडून ठेवणे विरुद्ध संत ज्ञानेश्वरांनी बंड केले. या असंतोषातून अमृतातेही पैजा जिंकणारी ज्ञानेश्वरी महाराष्ट्राच्या घराचे वैभव बनली. थोरल्या माधवराव पेशव्यांनी स्वराज्याचा ढासळता डोलारा सांभाळला. मदनलाल धिंग्रा, चाफेकर बंधू, कान्हेरे यांनी स्वातंत्र्याच्या वेदीवर आत्मबलिदान केले.

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर' बहुजन हिताय बहुजन सुखाय' अशी भारतीय राज्यघटना अस्तित्वात आली. पण भारतीय जनता अज्ञान, दारिद्र्य, बेकारी यांच्या यांच्या गर्तेत राहिली. जाती, धर्म, भाषा, प्रांत यातील भेद अधिकच वाढले. हे सर्व भेद नाही ते करून भारताला एकसंध राष्ट्र या पदाला पोहोचवण्याचे प्रचंड कार्य तरुणांना करायचे आहे.

आज राजकारणापेक्षा देशाला समाजकारणाची अधिकारच आहे. स्वराज्याचे सुराज्य करण्यासाठी तरुणांनी समाजसेवेचा वसा घ्यावा. समाजातील अपंग, मतिमंद, रुग्ण आदिवासी अशा गरजू, दुर्बल घटकांची सेवा करावी. अज्ञान, दारिद्र्य, अंधश्रद्धा याचा संपूर्ण नायनाट करण्यासाठी झटावे. स्त्रीमुक्ती चळवळ जोमाने चालवावी. या क्षेत्रात पथदर्शक म्हणून ताराबाई मोडक, बाबा आमटे, मदर टेरेसा या युती दीपस्तंभाप्रमाणे उद्या आहेत

भारताचे अंतकरण योग्य दिशेने प्रगती होण्यासाठी तरुणांनी स्वतःचे उद्योग सुरू केले पाहिजेत. विविध व्यावसायिक क्षेत्रात आधुनिक उपकरणाचा व साधनाचा तंत्रज्ञानाचा वापर केल्यास भारत आर्थिक दृष्ट्या उन्नती होऊ शकेल. विविध योजना, अल्पबचत योजना यामध्ये सहभागी होऊन तरुणाच्या आर्थिक समस्या सोडवणे सुलभ होईल. सर्व प्रकारचे प्रदूषण टाळण्यासाठी योग्य ते उपाय अमलात आणून सामाजिक वनीकरणाची मोहीम युद्धपातळीवर तरुणांनी राबून आरोग्य राखण्यासाठी लावा. आपल्या देशाच्या सीमेचे संरक्षण प्राणपणाने करणे हे प्रत्येक धोरणाचे परम कर्तव्य आहे. यासाठी जास्तीत जास्त तरुणांनी बलोपसना करून भारतीय संरक्षण दल, भारतीय पोलीस यासारख्या संघटनांमध्ये प्रवेश घेतला पाहिजे.

Explanation:

Hope my answer is correct and it helps you.

Mark me brainliest.

Similar questions