History, asked by Santoshc07, 4 months ago

माझी मातृभाषा निंबध मराठी​

Answers

Answered by akashkoushle842
3

Answer:

अमृताहुनी गोड असलेली मराठी हि आपल्या महान अशा महाराष्ट्राची मातृभाषा आहे. आपल्याला आईसारखी जवळची आणि प्रिय असलेल्या मराठी भाषेचा आम्हाला अभिमान आहे. आज असंख्य साहित्य मराठी भाषेत उपलब्ध आहे. सुरुवातीला आपल्या संतांनी लिहिलेले ग्रंथ, यानंतर अनेक विचारवंत आणि लेखकांनी लिहिलेली पुस्तके, कथा कादंबऱ्या यामुळे मराठी भाषेच्या साहित्यात अमुलाग्र बदल होत गेला. मराठी भाषेतील आद्यकवी शंकराचार्य यांनी आपल्या विवेकसिंधू ग्रंथामध्ये मराठी भाषेचा गौरव करताना सांगितले आहे कि आपल्या मराठी भाषेत इतके ग्रंथ उपलब्ध आहेत. खूप सारे ज्ञान आपल्या भाषेत उपलब्ध आहे. मग आपण ज्ञान मिळवण्यासाठी इतर भाषांचा उपयोग का करावा.

            माझी मराठी मला प्रिय आहे. परंतु महाराष्ट्रात मराठी भाषेला मनाचे स्थान मिळताना आजतरी दिसत नाही. हि आपल्या महाराष्ट्रातील जनतेसाठी दुर्दैवाची गोष्ट आहे. ठिकठिकाणी मराठी भाषेची गळचेपी होताना दिसते. मराठी शाळा बंद होऊन या शाळांची जागा इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी घेतली.  मराठी शाळांमध्ये मराठी हि ज्ञानभाषा असते म्हणजे सर्व विषयांचे ज्ञान आपण मराठी भाषेतून ग्रहण करत असतो. इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये इंग्रजी हि ज्ञानभाषा असते. सर्व विषयांचे ज्ञान विद्यार्थ्याला इंग्रजी भाषेतून घ्यावे लागते. मोठमोठ्या शिक्षणतज्ञांनी सांगितले आहे कि ज्ञान मिळवण्यासाठी आपली मातृभाषा उत्तम. परंतु हे आपल्या जनतेला आणि पालकांना कधी समजणार? आजच्या शिक्षणमहर्षीनी शिक्षणाचा बाजार उठवलाय. या बाजारात मराठी भाषेला नगण्य स्थान आहे. इंग्रजी पुढे चालले.

आपले उच्चभ्रू पालक लयच भारी. आपल्या पोरांना टाकायचं इंग्लिश शाळेत आणि ओरडायच मराठी भाषा मागे पडते आहे. अशा दुपट्टी पालकांनी मराठी भाषेच्या अभिमानाच्या वार्ता तर करूच नये. काय तर म्हणे मराठी शाळेत शिकवत नाहीत. दर्जा कमी होत चाललाय मराठी शाळेचा. इंग्रजी शाळेतील शिक्षणाचा दर्जा किती चांगला असतो हे पण सगळ्यांना माहित आहे.  ज्या दिवशी एखादा विध्यार्थी मराठी शाळेची पायरी सोडून इंग्रजी शाळेची पायरी चढतो त्या दिवशीच मराठी भाषा आपल्या महाराष्ट्राच्या शिखरावरून एक एक पायरी खाली येत राहते. आणखी किती खाली आणणार आपल्या मायबोलीला.   

            मराठी भाषेची अधोगती थांबवायची असेल तर आधी मराठी शाळांची अधोगती थांबवायला हवी. तरच आपल्याला अधिकार आहे

‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी’

हे म्हणण्याचा.

नाहीतर अस होईल,

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी |

आणि आई मुलांना इंग्रजी शाळेत पाठवती ||

Explanation:

hope it's help

please like my ans and mark me as brainlist

Answered by Anonymous
3

Explanation:

Answer

  • मातृभूमीविषयीचे विलक्षण, उत्कट प्रेम हा माणसाचा एक लक्षणीय विशेष आहे. आपला देश, तेथील संस्कृती, वेशभूषा, भाषा, परंपरा याची ओढ, याचा अभिमान रामायणापासून तर सावरकर साहित्यापर्यंत अक्षुण्णपणे व्यक्त होत आला आहे. अठ्ठावीस युरोपियन देशांच्या युनियनशी नाते तोडण्याचा जो निर्णय ब्रिटनने घेतला त्यामागे हे एक कारण असू शकते.

  • मातृभूमीच्या प्रेमाची भावना तेथे प्रबळ झाली असावीआज विज्ञान-तंत्र-यंत्र युगात जे सर्व विशेषांचे सपाटीकरण होते आहे त्याच्यापेक्षा ह्या घडामोडी वेगळ्या आहेत.भूमाता, मातृभूमी, ‘मदर अर्थ’ ही माणसाला प्राणाहून प्रिय असते. ‘भूमि: पुत्रोहं पृथिव्य:’ भूमी ही माझी माता आहे आणि मी पृथ्वीचा पुत्र, पृथ्वीचा अंश आहे असे ऋग्वेद सांगतो. या

  • .भूमातेशी आतड्याचे नाते असल्याने शेतीसाठी जमीन खोदणे, नांगरणे म्हणजे तिला जखमी करणे असे अनेक आदीम जाती मानतात.जॉन स्टाइनबेकच्या ‘दि ग्रेप्स आॅफ रॅथ’मध्ये ओक्लेहोमाचे रहिवासी आजोबा, वडील आणि नातू जगण्याच्या शोधात दुसरीकडे जायला निघतात. पण ‘हा प्रदेश कसाही असला तरी तो माझा प्रदेश आहे’ ही

  • आज मातृभूमीसाठी स्वत:चे कर्तव्य चोखपणे पार पाडणाऱ्या व्यक्तींची देशाला गरज आहे. धनदौलतीच्या हव्यासाने परदेशात धाव घेणाऱ्यांपेक्षा देशात राहून स्वाभिमानाने श्रम करणाऱ्यांची गरज आहे. संवेदनशीलतेने मातृभूमीवर प्रेम करणाऱ्यांची राष्ट्राला आस आहे

.

Similar questions