India Languages, asked by TransitionState, 1 year ago

माझी नोकरी मराठी निबंध, Mazi Naukri Essay in Marathi Language

Answers

Answered by cosmic41
3

Answer:

माझी नोकरी

मी नदीच्या काठी राहणारा एक माणूस आहे| माझे नाव राकेश आहे आणि मी माझ्या कुटुंबात एकटा आहे| एका मोठ्या बस अपघातात माझे आईवडील, पत्नी व मुले यांच्यासह मी माझे कुटुंब गमावले| माझ्यासाठी, जगणे खूप कठीण आहे आणि मी माझ्या आयुष्यात खूप कठीण वेळा गेलो होतो ज्यामुळे मी कठीण बनलो होतो|

माहिती तंत्रज्ञानामध्ये कुशल असल्याने मला अलीकडेच एक नोकरी मिळाली जी मला स्वतःला सांभाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात ऑफर करीत आहे| सुरुवातीला ही रक्कम अपेक्षेपेक्षा थोडी कमी होती परंतु माझ्या प्रयत्नांमुळे आणि मेहनतीने माझ्या बॉसने मला द्रुत पदोन्नती दिली होती | माझ्याकडे माझे काम अतिशय प्रामाणिकपणाने, सत्यतेने आणि योग्य पद्धतीने आहे जेणेकरून इतरांना माझ्या कामावर भाष्य करण्याची संधी मिळणार नाही |

माझ्या कार्यालय आणि व्यावसायिक कामाव्यतिरिक्त, मी अनाथ मुलांच्या धर्मादाय संस्थांना मदत आणि योगदान देखील देतो कारण मला माहित आहे की एकटे राहणे म्हणजे काय | माझे कोणतेही कुटुंब नसल्याने माझ्यासाठी ते अनाथ माझे कुटुंब आहेत | मी माझ्या दुय्यम काम म्हणून मी विचार करू शकतो अशा गोष्टींसाठी मी बरेच काही करतो | मी माझे कार्य केल्याने आणि मानवजातीसाठी योगदान देत असल्याबद्दल मला आनंद झाला आहे | माझा आनंद माझ्या गरजूंना मदत करण्याचा आणि शोधण्याच्या तीव्र आवेशात आहे |

Answered by jitendrakumarsha2432
0

Answer:

माझी नोकरी मराठी निबंध, Mazi Naukri Essay in Marathi Language

चांगली नौकरी मिळण्यासाठी चांगले गुण आणि कामाचा अनुभव असावा लागतो. आपल्या मागील पिढी मिळेल ती नोकरी आयुष्यभर करत असे आणि त्यातच आपले आयुष्य झोकून देत असत. तेव्हा त्यांच्याकडे नोकरीचे जास्त पर्याय नव्हते ,पण आता हजारो नवीन पर्याय आहेत. जागतिकीकरणा मुळे नोकरीचे नव नवीन मार्ग आपण निवडू शकतो. इंटरनेट च्या मदतीने आपण घराच्या घरी बसून विविध पर्याय शोधू शकतो.

नोकरी हा आपल्या आयुष्यातला एक खूप मोठा भाग आहे. यातून आपल्याला पैसा मिळतो, ज्याने आपण आपले आयुष्य रचतो. रोज आपण ८ ते १० तास ऑफिस मध्ये घालवतो, आय.टी क्षेत्रात कधी कधी तर १२ ते १६ तास ही जातात. आपल्या आयुष्याचा खूप मोठा हिस्सा आपण नोकरी शोधण्यात, ती सफल करण्यात आणि रोज ऑफिस ला जाण्यात घालवतो.

अश्या वेळी आपणाला आवडीची नोकरी करणे खूप गरजेचे आहे. अशी नोकरी ज्यात तुम्हाला मनापासून आवड आहे. रोज सकाळी ऑफिस ला जाताना आनंदी वाटेल अशी नोकरी. आताच्या युगात हे शक्य आहे. पण त्यासाठी तसे प्रयत्न केले पाहिजेत.

जर आपल्या आवडीची नोकरी असेल तर आपणास दिवसभर काम करणे जड जात नाही, उलट त्यात मजा येते. आपल्याला मानसिक त्रास होत नाही, चिडचिड होत नाही. अश्याने आपण आपल्या कुटुंबियांना, मित्र मैत्रिणींना दुखावत नाही. या पेक्षा सर्वात महत्वाचे महत्वाचे म्हणजे तुम्हाला मानसिक आनंद मिळतो.

पण अश्या नोकऱ्या चालून येणार नाहीत, त्या शोधाव्या लागतील. आपले छंद, आवड ज्यात आहे त्यात नोकरी शोधली पाहिजे. आजचे युवा तर एक पाऊल पुढे जात आहेत. दुसऱ्याच्या हाताखाली काम करण्यापेक्षा ते आपला स्वतःचा व्यवसाय करत आहे. ते आपले आयुष्य आपल्या हातात घेत आहेत. यात थोडी जोखीम असते पण त्याचे बक्षिसे हि तेवढेच मोठे असू शकते.

खूप लोक नोकरी न मिळण्याने सरकारवर नाराज असतात. पण ते स्वतःकडे पाहत नाहीत. संधी चालून येत नाही ती बनवावी लागते. नोकरीच्या मागणी नुसार आपण आपल्याला ट्रेन केलं पाहिजे. आता रोज नवीन टेकनॉलॉजि येते, ज्याने नवीन संधी निर्माण होते. त्या त्या टेकनॉलॉजि मध्ये अवगत होऊन आपण नोकरी मिळवू शकतो.

खूप सारे लोक नोकरीच्या नादात, पैसे कमावण्याच्या दबावात कुटुंब आणि आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे कि सरत शेवटी आपण नोकरी कुणासाठी करतो. जर आपण आरोग्याकडे लक्ष नाही दिले तर याचा आपल्या कामावर परिणाम होतो आणि अप्रत्यक्ष रूपात

Similar questions