माझी शाळा निबंध
मराठी
3 or 4 para only
Answers
Answer:
नमस्कार माझा ह्या ज्ञानमंदिरा... सत्यम् शिवम् सुंदरा "
खरोखरच प्रत्येक लहान मुलाच्या आयुष्यात शाळा ही खूप मोठी भूमिका बजावते कारण शाळेत जाण्यापूर्वी ते मुल घरातल्या छोट्याशा जगात असते. त्याचा बाहेरील मोठ्या जगाशी परिचय होतो तो शाळेमुळेच होतो, म्हणूनच शाळेचे महत्व लहान मुलच्या जीवनात फार असते.
माझी शाळा आमच्या घराजवळच आहे, शाळेत चालत जाण्यास बरोबर बारा मिनिटे लागतात. ही बारा मिनिटे मी जणू काही वा-यावर उडतच पार करतो. परंतु कधी उशीर झाला की बस मधे जव लागत.माझे कित्येक मित्र दूरवरून आमच्या शाळेत येतात आणि त्यांना शाळेच्या बसने यावे लागते. त्यामुळे त्यांना माझा हेवा वाटतो.
आमच्या शाळेत शिस्तीचे महत्व फार आहे, शाळेची पहिली घंटा होते तेव्हा सर्व मुले शाळेच्या फाटकाच्या आत आलेली असली पाहिजेत, दुसरी घंटा होते तेव्हा आपापल्या वर्गात गेली पाहिजेत आणि तिस-या घंटेला प्रार्थना सुरू झाली पाहिजे असा आमच्या मुख्यराध्यापकांचा आग्रह असतो.