माझा देश essay in marathi {only in 100 words (one paragraph)}
Answers
mark it as brainlist
*माझा देश*
"बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो।"
माझा देश , माझा भारत महान आहे. जगातील सर्वात मोठे गणतंत्र म्हणून माझा देश ओळखला जातो.
अनेक जाती धर्माचे लोक ह्या भूमीवर बंधुत्वाने राहतात. गंगा माय ह्या भूमीला सुजलाम सुफलाम करते. शेतकऱ्यांचा देश म्हणून लौकिक असणारा माझा देश कृषी क्षेत्रात जोमाने कार्यरत आहे. विश्वातील आठ चमत्कारांपैकी एक 'ताज महाल' माझा देशाची शान वाढवो. इथे प्रत्येक माणूस देव जरी वेगळा मानत असला तरी प्रत्येक मनात तिरंगा आहे. देशासाठी प्राण देण्यासाठी अनेक जवान येथे तत्पर असतात.
दिधशे वर्ष भारत इंग्रजांच्या गुलामीत होता. पण ह्या महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, स्वतंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक, भगत सिंह आणि अनेक भूमिपुत्रांना त्यांचा प्राणाची आहुती देऊन भारत मातेला गुलामीच्या बेड्यांपासून मुक्त केलं आहे. भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर ह्यांनी भारतीय संविधान रचले आणि भारत गणतंत्र देश झाला.
भारत आज जरी प्रगितीशील देशांमध्ये असेल तरी काही क्षेत्रात भारताने अगदी अतुलनीय काम केले आहे. भारतीय संगठना इस्रोने मंगळ गाठले आहे. अनेक देशात भारतीय संशोधक आपल्या देशाचे नाव करत आहेत.
अशा ह्या महान भारत भूमीला माझे शत शत प्रणाम.
जय हिंद.