माझा देश माझा अभिमान या विषयावर २०/३० ओळींचा परिच्छेद लिहा in marathi
Answers
Answer:
आमच्या पेर्णास्त्रोतामधे बर्याचं गोष्टींचा उहापोह केलेला दिसतोयं आणि त्याच्यावर प्रतिक्रिया लिहिण्यापेक्षा हा आख्खा लेख पाडणं मला जास्तं सोईस्कर वाटलं. शाळेमधे प्रत्येक दिवशीची सुरुवात राष्ट्रगीत आणि प्रतिज्ञेनी होते. रोजचा "प्रोटोकॉल" म्हणुन हा सोपस्कार उरकला जातो. किती जणं त्या राष्ट्रगीतामधल्या किंवा प्रतिज्ञेमधल्या गर्भितार्थ समजुन उमजुन त्याचा वापर रोजच्या जीवनात करतात? अर्थात शालेय वयामधे ही अक्कल मला नव्हती त्यामुळे ती अक्कल त्या वयामधे लहान मुलांमधे असेल ही अपेक्षा करणं चुकीचं आहे माझ्या दृष्टीने. कॉलेजमधे अक्कल आलेली असते पण ज्या राष्ट्रगीताचं आणि प्रतिज्ञेचं पालनं करावं अशी अपेक्षा असते ती मात्र १५ ऑगस्ट, २६ जानेवारी आणि फारफार तरं १ मे महाराष्ट्र दिनाचा प्रोटोकॉल एवढीचं सिमीत असते. त्यामधला अर्थ आचरणात आणायसाठी जी संवेदनशिलता लागते ती मात्र शाळेतचं राहिलेली असते.
पुढचा लेख वाचायच्या आधी एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा. माझं माझ्या मातृभुमीवर प्रचंड प्रेम आहे आणि मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत भारताशी एकनिष्ठ राहिन. माझी काही मतं प्रतिकुल वाटतीलही पण त्याचा माझ्या राष्ट्रभक्तीशी काडीमात्र संबंध नाही. त्यामुळे इथे राष्ट्रभक्ती, इंटेग्रिटी वगैरे च्या नावानी गळे काढणार्यांनी किंवा प्रतिसाद लिहु पाहणार्यांनी लेख वाचला नाही तरी चालेल.
Hope it's help you