India Languages, asked by patilmahendra615, 4 days ago

माझी वसुंधरा निबंध लेखन​

Answers

Answered by nirajlokhande1174
5

Answer:

शाळेच्या पालक सभेमध्ये जमलेल्या पालकांची आपापसांत चर्चा चालली होती की, आजच्या या मुलांच्या डोक्यावर किती अभ्यासाचा भार आहे? सर्व पालकांचे या विषयावर एकमत झाले होते. त्यांच्या गप्पा चांगल्याच रंगात आल्या होत्या. मुलांच्या अभ्यासाच्या विषयामध्ये किती नवनवीन विषय समाविष्ट केले जात आहेत. ‘परिसर आणि पर्यावरण अभ्यास’ या विषयांची काय गरज आहे? मुलांच्या डोक्यावर ओझे आहे नुसते. त्या त्यांच्या रंगलेल्या गप्पांमध्ये मध्येच मला स्वतःच मत मांडावेसे वाटले, “ हे पालकांनो मुलांचे पालक म्हणून जी तुमची कर्तव्ये आहेत ती तुम्ही नीट पार पाडत नाहीत, म्हणून मुलांना त्या गोष्टींबाबत ज्ञान देता यावे म्हणून शासनाला हे सर्व निर्णय घ्यावे लागतात.

आपले आरोग्य, आपले घर यांचा परस्परांशी किती संबंध आहे, हे तुम्ही कधी आपल्या मुलांना सांगितलेच नाही. आपला परिसर स्वच्छ ठेवणे किती महत्वाचे आहे हे तुम्ही कधीही आपल्या मुलांच्या मनावर ठसवले नाही. आपल्या भोवतालचे वातावरण शुद्ध राहवे म्हणून तुम्ही तुमच्या आजूबाजूला कडुलिंब, दुर्वा, तुळस यांसारख्या वनस्पतींची कधी आवर्जून लागवड केली आहे का? प्राचीन काळामध्ये एकत्रित कटुंबसंस्थेमध्ये लहान असतानाच मुलांवर मोठ्या माणसांकडून संस्कार केले जायचे. मात्र आत्ता विभक्त कुटुंबव्यवस्थेत या गोष्टींचा अभाव असल्याचे दिसून येते. त्यामुळे आत्ता ही जबाबदारी समाजची म्हणजेच शाळेची ठरते.

अगदी मोठ्या गरुडा पासून ते अगदी लहान मुंगीपर्यंत सर्वजण पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत करत असतात. पण सर्वश्रेष्ठ असणारा माणूस मात्र आपल्या बुद्धीच्या जोरावर या पर्यावरणाचा समतोल बिघडवतो आहे. माणसाचे असे हे बेफिकीरपणे वागणे एक दिवस जग निर्मनुष्य करून सोडेल, असा धोका आत्ता वाटू लागला आहे. निसर्गाने मानवाला अन्न, वस्त्र, निवारा यांसारख्या अनेक महत्वाच्या गोष्टी दिल्या पण मानवाने त्याचा योग्य उपयोग केला नाही, नेहमी दुरुपयोगच करताना दिसत आहे.आणि त्यावेळी तो आपल्या भविष्याचा विचार करीत नाही.अलीकडे तर शहरातील माणूस मातीला विसरत चालला आहे.. वाढती वृक्षतोड मानवाच्या अस्तित्वावरच आघात करीत आहे. माणूस आपले सौंदर्य जपण्याचा आटोकाट प्रयत्न करतो परंतु, या वसुंधरेची जरासुद्धा काळजी घेत नाही.

धरणीमातेचा ऱ्हास करणाऱ्या या अविचारी माणसमध्ये जागरुकता निर्माण व्हावी म्हणून ‘वसुंधरा दिन’ हा दिवस २२ एप्रिल रोजी साजरा केला जावू लागला. पर्यावरणाचा हा प्रश्न साऱ्या सृष्टीच्या अस्तित्वाशी संबंधीत असल्याने आंतरराष्ट्रीय ग्राहक संघटनेकडून १९९२ सालापासून हा वसुंधरा दिन साजरा केला जावू लागला.

माणसांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. जशी जशी लोकसंख्या वाढत चालली आहे तसेच या पृथ्वीवर मानवनिर्मित कचऱ्याचे साम्राज्यसुद्धा वाढत चालले आहे. त्यामध्ये वर्षानुवर्षे नष्ट न होणाऱ्या प्लास्टिक चा कचरा तर अगदी दक्षिण ध्रुवापासून ते अगदी उत्तर ध्रुवापर्यंत पासरला आहे. अशा प्रकारे माणूसच या पर्यावरणाच्या ऱ्हासाला कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे आत्ता माणसाला या त्याच्या चुकांचे गंभीर परिणाम भोगावे लागत आहेत.

आपल्या वागणुकीचे पर्यावरणावर गंभीर परिणाम होत आहेत हे समजल्यावर आजकाल माणसामध्ये पर्यावरणाचे जतन करण्याची तीव्र जाणीव निर्माण झाली आहे. त्यासाठी विविध कायदे, नियम तयार केले गेले आहेत. आपली वाहने नेहमी सुस्थितीत ठेवणे, वेळोवेळी पी.यु.सी. तपासणे, सार्वजनिक वाहनांचा जास्तीत जास्त वापर करणे, कारखान्यातील दुषित पाण्याची योग्य ती विल्हेवाट लावणे, ओला कचरा सुका कचरा अशी तयार होणाऱ्या कचऱ्याची विभागणी करणे, यांसारख्या अगदी छोट्या छोट्या गोष्टींचा अवलंब करून आपल्याला आपल्या पर्यावरणाचा समतोल टिकवला पाहिजे. उपलब्ध उपाययोजनांचा वापर करून आपल्या पर्यावरणाचे जतन केले पाहिजे. भारतासाख्या देशामध्ये सौर उर्जेचा जास्तीत जास्त वापर करणे खूप फायदेशीर आणि पर्यावरणपूरक आहे. सारा समाज जेव्हा पर्यावरणाच्या रक्षणासाठी मनापसून प्रयत्न करेल तेव्हाच तो आपली प्रगती साधू शकेल.

Hope it helps

Please Mark as Brainliest

Answered by Mithalesh1602398
0

Answer:

माझी वसुंधरा हा एक अतुलनीय स्वरूप आहे ज्यामध्ये आम्ही सगळे निवसतो. हे आमच्या जीवनाचा मुख्य आधार आहे ज्याच्या विनामूल्य अस्तित्वाचे आम्ही सर्व सुख आणि तपशील अनुभव करतो.

Explanation:

माझी वसुंधरा हा एक अतुलनीय स्वरूप आहे ज्यामध्ये आम्ही सगळे निवसतो. हे आमच्या जीवनाचा मुख्य आधार आहे ज्याच्या विनामूल्य अस्तित्वाचे आम्ही सर्व सुख आणि तपशील अनुभव करतो.

माझी वसुंधरा एक विशाल गोलदेह आहे ज्यावर विविध प्रकारच्या भूमी, जलवायु आणि प्राण्यांचा समावेश आहे. आम्ही या गोलदेहाच्या अंतराळात जीवन जगताच्या सर्व प्रकारच्या प्राण्यांचा समावेश अनुभव करतो. हे आमच्या जीवनाचे एक महत्वाचे अंग आहे ज्यामुळे आम्ही सर्व जीवनाच्या एकत्वाच्या भावनेत राहतो.

माझी वसुंधरा एक आश्चर्यजनक संसार आहे ज्यामध्ये आम्ही विविध संसारीय जीवन आणि संस्कृतींचे समावेश अनुभव करतो. आम्ही एकमेकांच्या संपर्कात असतो आणि आम्ही एकमेकांच्या संरचनेत विलीन होतो.

To learn more about similar questions visit:

https://brainly.in/question/31852403?referrer=searchResults

https://brainly.in/question/12033659?referrer=searchResults

#SPJ6

Similar questions