माझ्या भाषेचे अमृत प्राशेल तो भाग्यवंत,
तिचा नाही दुजाभाव असो कोणताही पंथ
ह्याच अर्थ
Answers
I not know the answer of this question
Answer:
माझ्या भाषेचे अमृत प्राशेल तो भाग्यवंत, तिचा नाही दुजाभाव असं कोणताही पंथ. मृणालिनी कानिटकर- जोशी या प्रसिद्ध कवीयत्री यांच्या "माझी मराठी" या कवितेतील ओळी आहेत.
Explanation:
सदर कवितेच्या माध्यमातून कवियत्री मराठी भाषेचे गुणगान गातात. मराठी भाषा ही किती प्रगल्भ आणि संयमी आहे हे त्यांच्या कवितेच्या माध्यमातून स्पष्ट होते. कवियत्री म्हणते मराठी भाषा ही सर्वांना सामावून घेते आणि जो कोणीही या मराठी भाषेचे अमृत पिणार तो खरच भाग्यवान आहे कारण मराठी भाषा ही कधीही भेदभाव करत नाही. कवियत्री मराठी भाषेची तुलना अमृता सोबत करतात, ज्याप्रमाणे अमृत पिऊन मानव तृप्त होतो त्याप्रमाणे मराठी भाषा माणसाला तृप्त करते. व्यक्ती हा कुठल्याही धर्माचा, जातीचा,पंथाचा असो माझी मराठी ही सर्वांना सामावून घेते आणि तिच्यातील गोडवा ही सर्वान पर्यंत पोहोचते.