India Languages, asked by mamtaalgulwar, 16 days ago

'माझ्या गावातील यात्रा पाहिल्यानंतर...' या विषयावर 20-25 ओळीत निबंध लिहा. ​

Answers

Answered by chavanswarup456
0

Explanation:

आमच्या गावची जत्रा

         माझ्या गावाचे नाव आहे धरणगाव. जळगाव जिल्ह्यातील एक छोटेसे गाव. गावची लोकसंख्या जेमतेम पंधराशे असेल, पण गावातील लोकांच्या मनगटात दम मात्र पंधराहजार लोकांचा आहे.

       आमच्या गावांमध्ये बिजासनी देवी चे प्रसिद्ध देऊळ आहे . या देवीवर गावातील सर्व भाविकांची फार मोठी श्रद्धा आहे. मनापासून भक्ती करणाऱ्याला आई बिजासनी पावतेच , आणि त्याच्यावर कृपा करतेच. अशी लोकांची धारणा आहे . तसे अनेकांना प्रत्यय देखील आलेले आहेत . 

       आमच्या घरातही बिजासनी मातेचा एक फोटो आहे मी दररोज त्या फोटोची आरती करतो आणि  पाया पडतो.

 दरवर्षी गणपती बाप्पा चे आगमन होते त्या दिवसापासून सलग तीन दिवस आमच्या गावांमध्ये जत्रा भरते .गावातील प्रमुख प्रतिष्ठित मंडळी या जत्रेचे नियोजन करतात . बिजासनी मातेच्या मंदिराला सुंदर रंग देण्यात येतो .  विद्युत रोषणाई करून मंदिर सजवले जाते  . या दिवसांमध्ये मंदिराचे सौंदर्य अधिकच खुलून दिसते. एकीकडे गणपती बाप्पाचे आगमन झालेले असते व आई बिजासनी च्या आगमनाने जणू गणपती बाप्पा बरोबर बाप्पाची आईच आलेली आहे असे सर्वांना वाटते . गणपतीच्या आरती बरोबरच आईची आरती हि मोठ्या भक्तिभावाने केली  जाते.

      जत्रेच्या दिवसांमध्ये गावातील मंडळी आपल्या पै पाहुण्यांना राहण्यासाठी आपल्या घरी बोलतात . या दिवसांमध्ये गणपतीमुळे सगळीकडे रोषणाई तर असतेच आणि त्यातूनच अधिक सौंदर्य खुलते ते बिजासनी मातेच्या  आगमनाने . सुरुवातीचे तीन दिवस नवरात्री प्रमाणे दांडिया देखील खेळला जातो. तीन दिवसांच्या जत्रेमध्ये शेवटच्या दिवशी यामध्ये विविध प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन केले जाते.

plz mark as brainliest

Similar questions