India Languages, asked by wasnikanchal29, 17 days ago

"माझ्या जीवनातील शिक्षकाचे स्थान "या विषयावर निबंध150 शब्दात लिहा​

Answers

Answered by ananyaacharp
20

Answer:

जीवनात गुरुचे स्थान सर्वात महत्वाचे आहे. पण गुरुही योग्य असला पाहिजे. जन्मापासून आपण आपल्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक गोष्टींपासून, व्यक्तिपासून काही ना काही तरी शिकतच असतो. आणि म्हणूनच तर आपण जगण्यायोग्य बनत जातो. आणि प्रत्येक गोष्ट जी आपल्याला शिकवण देते ती गुरुच असते. उदाहरणार्थ सूर्य, पृथ्वी, वारा, अग्नी, जल, नद्या, झाडे, फुले, पाने, ढग, डोंगर निसर्गातली प्रत्येक गोष्ट आपल्याला काही तरी बोध देत असते. या सर्वांना आपण गुरुस्थानी मानून त्या प्रत्येक पदार्थाविषयी कृतज्ञता बाळगली पाहिजे. त्यांची देण्याची, त्यागाची, परोपकारी वृत्ती आपल्यात आली पाहिजे. आणि या गोष्टी शिकवण्यासाठी आपल्याला योग्य गुरूची आवश्यकता असते.

योग्य गुरू? हो योग्यच गुरू आपल्याला लाभायला हवा. कारण हल्ली योग्य गुरू लाभणे दुरापास्त झाले आहे. मूल जेव्हा जेव्हा घरात असते तेव्हा आईवडील त्याच्यावर संस्कार करत असतात. त्याला छोट्या छोट्या गोष्टीतून जीवनात कसं वागायचं ते समजावत असतात. आईवडील हेच तर आपले प्राथमिक अवस्थेतले प्रथम आणि महत्वाचे गुरू असतात. पण आजकाल आई वडीलांकडे तरी कुठे वेळ असतो? दोघे नोकरी करीत असल्यामुळे त्यांना मुलांकडे लक्ष देण्यास वेळ मिळत नाही. मग ते कसे करू शकतील मुलांवर चांगले संस्कार?

त्यानंतर नंबर लागतो तो शाळेतील शिक्षकांचा. त्यांचीही खूप महत्वपूर्ण भूमिका असते मुलांवर चांगले आणि योग्य संस्कार करण्याची. बालमनाला पैलू पाडण्याचं काम हे प्राथमिक शाळा आणि नंतर हायस्कुलमधे होत असते. आईवडील, आणि प्राथमिक शाळेतील शिक्षक यांनी केलेले कोऱ्या पाटीवरील संस्कार हे टिकाऊ असतात. मग ते चांगले असोत किंवा वाईट. त्याचाच प्रभाव त्या मुलांच्या पुढील आयुष्यात कायम राहतो.

Answered by soniatiwari214
3

उत्तर:

शिक्षक हेच विद्यार्थ्यांना प्रत्येक क्षेत्रात चांगले काम करण्यास प्रवृत्त करतात आणि त्यांना जीवनातील ध्येये साध्य करण्यात मदत करतात. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना योग्य आणि अयोग्य यातील फरक कळतो.

स्पष्टीकरण:

सर्व प्रथम, आपण शिक्षक कोण आहे हे जाणून घेणे आवश्यक आहे. सर्वसाधारणपणे, शिक्षकाची व्याख्या अशी आहे की, जी व्यक्ती विद्यार्थ्यांना शाळा, महाविद्यालये किंवा खाजगी मध्ये शिकवते आणि विशिष्ट विषयांचे ज्ञान देते, गृहपाठ तपासते आणि अभिप्राय देते.

बरं, ही एक सामान्य व्याख्या आहे परंतु 'शिक्षक' हा शब्द यापेक्षा काहीतरी अधिक आहे. शिक्षक असणे म्हणजे केवळ ज्ञान देणे, व्याख्याने देणे आणि मागे-पुढे वर्गात जाणे यापेक्षा बरेच काही आहे. शिक्षक हा असा असतो जो त्यांच्या विद्यार्थ्यांच्या जीवनात महत्त्वपूर्ण प्रभाव पाडतो. तो/ती त्यांना स्वतःची एक चांगली आवृत्ती होण्यासाठी आणि जीवनात काहीतरी महत्त्वपूर्ण साध्य करण्यासाठी प्रेरित करतो.

शिक्षक उमेदवारांना सहभावना, बंधुभाव, दयाळूपणा आणि साधेपणा यासारख्या अद्वितीय गुणांवर शिक्षित करतात. शिक्षक सर्वत्र एकाच प्रकारच्या विद्यार्थ्यांशी कधीच टक्कर देत नाहीत, उलट प्रकार वेगवेगळे असतात. आज ते उच्च महत्वाकांक्षा असलेल्या एखाद्याला भेटू शकतात आणि त्यांना योग्य सल्ला देऊ शकतात. ध्येयहीन व्यक्तींना शून्य गांभीर्याने भेटणे आणि त्यांना स्वतःची एक चांगली आवृत्ती होण्यासाठी प्रभावित करणे हे खरे आव्हान आहे.

त्यामुळे शिक्षकाचे कर्तव्य केवळ व्याख्यानांना उपस्थित राहणे आणि नोट्स पाठवणे इतकेच मर्यादित नाही. हे त्याच्या पलीकडचे काहीतरी आहे आणि त्यांच्या विद्यार्थ्याच्या जीवनात त्याचे महत्त्वपूर्ण महत्त्व आहे

#SPJ3

Similar questions