माझ्या जीवनातील शिक्षकाचे स्थान या विषयावर तुमचे विचार लिहा
Answers
जीवनातील शिक्षकाचे स्थान : मला माझे शिक्षक फार आवडतात, कारण ते आम्हाला योग्य शिक्षण देतात वेळ पडली तर धडा ही शिकवतात. सर्वच शिक्षक विद्यार्थ्यांना ज्ञानी आणि सुसंस्कृत बनवतात. शिक्षक ही देवाने दिलेली एक सुंदर देणगी आहे कारण देव संपूर्ण जगाचा निर्माता आहे आणि शिक्षक संपूर्ण राष्ट्राचा निर्माता आहे. शिक्षक हा विद्यार्थ्याच्या जीवनातील एक महत्त्वाचा प्राणी आहे, जो आपल्या ज्ञान, संयम आणि प्रेमाने विद्यार्थ्याच्या संपूर्ण जीवनाला एक मजबूत आकार देतो. विद्यार्थ्यांच्या भविष्याची जबाबदारी घेण्याचा संयम आणि आत्मविश्वास शिक्षांमध्ये असतो. त्यांना फक्त त्यांच्या विद्यार्थ्यांना यशस्वी आणि आनंदी पाहायचे असते. शिक्षक हे समाजातील अत्यंत प्रतिष्ठित व्यक्ती आहे, जे आपल्या शिक्षणाच्या जादूद्वारे सामान्य लोकांची जीवनशैली आणि मानसिक स्तर उंचावण्याची जबाबदारी घेतात. ह्या सर्व गोषटींमुळे मला शिक्षक फार आवडतात.
आमचे शिक्षक हे आम्ही विद्यार्थ्यावर चांगली छाप पाडली आहे. तसेच कोणत्याही विद्यार्थ्याकडून चूक झाली की आमचे शिक्षक धडा शिकवतात आणि त्यांच्या चुकीची जाणीवही करून देतात. ते आपल्याला स्वच्छ कपडे घालायला शिकवतात, सकस आहार घ्यावा, चुकीच्या अन्नापासून दूर राहा, पालकांची काळजी घ्या, इतरांशी चांगले वागले आणि काम पूर्ण करण्याचे महत्त्व समजून घेण्यास मदत करतात. मुलांचे भविष्य आणि वर्तमान दोन्ही शिक्षक घडवतात. या मुळेच मला वाटते की जीवनात शिक्षकांचे महत्व अपार असे आहे.
प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात शिक्षकांचं महत्त्वपूर्ण स्थान असतं. कुंभार मातीला चांगला आकार देत सुबक मडकी घडवतो, त्याप्रमाणे माझ्या शिक्षकांनी माझ्यावर चांगले संस्कार करत मला घडवलं. अजूनही घडवत आहेत. ते मला उत्तम मार्गदर्शन करतात. शिक्षकांनी दिलेला अभ्यासाचा, शिस्तीचा, चिकाटीचा मंत्र जपत मी चाललो आहे. जीवनात चांगला माणूस व्हायचं आहे. क्रीडाक्षेत्रात आपल्या देशाचं नाव उज्ज्वल करण्याचं माझं स्वप्न आहे आणि त्यात मला नक्कीच यश मिळेल हा विश्वासही मला माझ्या शिक्षकांमुळेच मिळाला आहे.