माझ्या मराठी भाषेची
काय वर्णावी थोरवी,
दूर देशी ऐकू येते
माझ्या मराठीची ओवी
वरील काव्यपंक्तीचा सरळ अर्थ तुमच्या शब्दात लिहा.
Answers
Explanation:
माझी मराठी भाषा ही सर्वश्रेष्ठ आणि समृद्ध आहे. मराठी मातीत अनेक संत कवी घडून गेले मराठी भाषेबद्दल जेवढे बोलावे सांगावे तितके थोडे आहे. आज मराठी भाषा जगभरात प्रसिद्ध आहे
Answer:
मृणालिनी जोशी कानिटकर या मराठी कवयित्रीच्या माझी मराठी या कवितेतील दिलेल्या ओळी आहेत.
मराठी भाषेबद्दल असलेले तिचे प्रेम या कवितेतून व्यक्त करताना कवयित्री करताना दिसतात. त्या म्हणतात मराठी माणसांच्या मनामनात मराठी भाषा वसलेली आहे. जगाच्या कुठल्याही भागात मराठी माणूस गेला तरी त्याचे मराठी भाषेविषयीचे प्रेम कधीही कमी होत नाही असे त्या म्हणतात.
मराठी भाषा ही फक्त मराठी प्रांता पुरती मर्यादित राहिली नसून संपूर्ण भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात पसरलेली आहे. मराठी भाषेत लिहिलेले अनेक ग्रंथ, काव्य, संतांच्या ओळी, अभंग परदेशातील लोक देखील अभ्यास करताना दिसतात.
संपूर्ण जगाला ज्ञान पाजणारी माझी भाषा म्हणून कवयित्री आपल्या भाषेचा गोडवा गाताना या कवितेतून दिसतात.