माझ्या मराठी भाषेची
काय वर्णावी थोरवी,
दूर देशी ऐकू येते
माझ्या मराठीची ओवी
वरील काव्यपंक्तीचा सरळ अर्थ तुमच्या शब्दात लिहा.
Answers
Explanation:
माझी मराठी भाषा ही सर्वश्रेष्ठ व समृद्ध आहे.या मराठी मातीत अनेक संत कवी होऊन गेले त्यांनी लिहिलेले काव्य जगभरात प्रसिद्ध आहेत तिच्याबद्दल जेवढे सांगावे तेवढे थोडेच आहे तिच्या मातीत अनेक संत कवी घडले त्यांचं आज जगभरात नाव आहे. दूर देशात सुध्धा मराठीची थोरवी ऐकायला येते .
Answer:
वरील काव्यपंक्ती ह्या कवयित्री मृणालिनी कानिटकर जोशी यांच्या माझी मराठी या कवितेतील आहेत.
कवयित्री चे मराठी भाषेविषयी चे प्रेम कवितेच्या माध्यमातून स्पष्ट होते. कवयित्रीला मराठी भाषे बद्दल फक्त प्रेमच नाही तर खूप आदर देखील वाटतो. मराठी भाषा ही कशी श्रेष्ठ आहे व त्याचा प्रत्येकाला कसा अभिमान वाटायला पाहिजे हे कवयित्री आपल्या कवितेच्या माध्यमातून स्पष्ट करतात.
कवयित्री म्हणतात की माझी मराठी भाषा किती थोर आहे तिचे वर्णन करणे ही कधीकधी शब्दात शक्य होत नाही. मराठी भाषा ही सातासमुद्रापलीकडे पोहोचलेली आहे व आपल्या भाषेच्या माध्यमातून संपूर्ण जगात गोडवा पसरवलेला आहे असे कवयित्री म्हणतात.
फक्त देशातीलच नाही तर बाहेर देशातील लोक देखील मराठी भाषेच्या ओवी गात असतात यातूनच मराठी भाषा ही कशी थोर आहे हे स्पष्ट होते.