India Languages, asked by sujee84, 11 months ago

माझ्या देशावर माझे प्रेम आहे निबंध​

Answers

Answered by mansi440
67
आपला देश स्वतंत्र होऊन ६९ वर्षे झाली … आणी आपण हा दिवस अतिशय चांगल्या पद्धतीने साजरा ही करू …. कोणी शर्टाला तिरंग्याचा ट्याग लावेल … कोणी झेंडा घेऊन फिरेल … बरेच काही…

पण मला एक गोष्ट आजही समजल नाही … आपल्या प्रतिज्ञेत सुरवातीचेचं वाक्य आहे बघा ..

“भारत माझा देश आहे, माझ्या देशावर माझे प्रेम आहे” !!

माझ्या देशावर माझे प्रेम आहे … म्हणजे नेमक काय आहे ??

याचा अर्थ असा का ? देश म्हणजे ही माती .. दगड …. जमीन ??? नेमक काय ???

देश हा एक असा मुद्दा आहे जो आम्हाला फ़क़्त क्रिकेट पाहताना … कारगील सारखे युद्ध होतानाच आठवतो.

आण्णा हजारेंनी आंदोलन केले … आम्हाला देश आठवला …

भारतीय क्रिकेट टीम ने वल्डकप जिंकला … आम्हाला देश आठवला …

एखाद्या मुलीवर बलात्कार होतो …. आम्ही हातात मेणबत्या घेऊन फिरतो … का ?? तर … आम्हाला देश आठवला …

१५ ऑगस्ट … २६ जानेवारी .. आला … आम्हाला देश आठवला …

पण …

दैनंदिन जीवनात लाखो गोष्टी होतात ज्यामुळे या देशाला, भारतीय संस्कृतीला, आणी मानव धर्माला कीड लागत आहे… का नाही आठवत आम्हाला देश ???

या सगळ्या गोष्टींमुळे मध्यम वर्गीय माणूस अक्षरशा भरडून निघत आहे …. काही उदाहरण घ्या ना…..

१) घराला कुलूप लाऊन काही दिवस माणूस गावाकड जातो, गेला ना गेला इकडे त्याच घर फोडतात आणी चोरी होते … पोलीस केस करायची म्हणलं तर पैसे द्या …. चोर कोण असतो हेही माहित असते यांना … तरीही एकही चोरीची गोष्ट परत मिळत नाही… बिचारा चार पैसे गाठीला बांधून मुठभर सोन घेऊन ठेवलेला असतो… आणी एका दिवसात तो अक्षरशः नागडा होतो…. .का नाही आठवत आम्हाला देश ?

२) सरकारी काम असले तर समजा तो मेलाच….. का नाही आठवत आम्हाला देश ?

३) चांगल्या गोष्टी घडवून आण्यासाठी इथे आंदोलन … जाळपोळ होते …आणी त्यामध्ये एक सामान्य माणूसच दुसऱ्या सामान्य माणसाला मारतो … आणी ज्यांना हे हव असत ते मज्ज्या बगत बसतात … समजत नाही का हो आम्हाला ?? एवढे आंधळे झालो का आपण?? हेच शिकलो का आम्ही आमच्या युग्पुरुश्यांकडून ?? का नाही आठवत आम्हाला देश ?

३) चांगल खायला मिळत नाही …. भाज्या घ्या त्या ही इंजेक्टेड … फळ घ्या ते ही इंजेक्टेड … लेकरांना बाहेरच दुध म्हणजे तर विषच … काय मिसळतील त्यात काय नेम नाही ??? का हो ??? पैसा एवढा प्यारा झाला का, की त्यामुळे आपण दुसर्यांचा जीव घ्यावा?? हा खून नाही ??? का नाही आठवत आम्हाला देश ?

४) लेकरांना शाळेत पाठवायची भीती … बलात्कार तर होताच … आता लहान मुलांचे लैगिक शोषण ही ?

५) कुटुंबाला घेऊन बाहेर फिरायला जाव तर राहीलच नाही आजकाल…. काय बातम्या आहेत आजकाल … बापरे … जगन खरच एवढ घाणेरड झाले का हो ?? …. का नाही आठवत आम्हाला देश ?

६) नोकरी करा … कर भर …. हे ठीक आहे हो …

पण कर भरून उरलेल्या पैश्यात कपडे घ्या त्यावरही २-३ प्रकारचे कर भरा…

गाडी घेताना रस्त्याचा कर भरा … त्या पैश्यातुनच सरकार रस्ते बांधणार … त्या रस्त्यावरून फिरायचे आहे तर टोल भरा …. अरे काय ??? काय कारभार ?? का नाही आठवत आम्हाला देश ?

७) एखादा मोठ्ठा पुढारी त्याची मनमानी करतो, त्याच्या विरुद्ध आवाज करावा तर तो आपल्याला गप्प करतो…

८) नोकरीत राजकारण.. जातपात… धर्म भेद ..

समाजात राजकारण.. जातपात… धर्म भेद ..

आणी म्हणे “सारे भारतीय माझे बांधव” .. पटतंय का? का नाही आठवत आम्हाला देश ?

एकमेकांना समजून घ्यायचं नाही आम्हाला…. आम्हाला फ़क़्त पैसा.. गाडी… घर … त्यासाठी माणुसकी… प्रेम आम्ही गावाबाहेर वेशीवर ठेवलंय …. आणी म्हण “माझ्या देशावर माझे प्रेम आहे”

फार लाजिरवाणी गोष्ट आहे ….. मागच्या पिढीचे सोडा हो… आजकालचे तरुण ही .. जात… धर्म… मला हे.. तुला ते… हे माझे … हे तुजे ….आणी नाव कुणाची घ्यायची तर शिवाजी महाराज … महाराणा प्रताप… महात्मा फुले…. किती किती …

असो….. तरीपण आपण १५ ऑगस्ट आपला स्वतंत्र दिवस अगदी उत्साहाने साजरा करू… कारण १६ ऑगस्ट ला परत तेच … रोजच…..

काही चुकल असेल … भावना दुखावल्या असतील तर ४ शिव्या देऊन सोडून देणे….


Hope it helps in some way!!!


Pls mark me as Brainliest!!
Answered by halamadrid
64

■■ माझ्या देशावर माझे प्रेम ■■

मला माझ्या भारत देशावर खूप प्रेम तसेच अभिमान आहे. मला माझ्या देशाच्या विविधतेवर प्रेम आहे. इथे वेगवेगळ्या धर्मांची, विवध सण आनंदाने साजरा करणारी, वेगवेगळ्या भाषा बोलणारी लोक राहतात. इतकी विविधता असून ही माझ्या देशात एकता आहे.

मला माझ्या देशाच्या संस्कृति आणि परंपरेवर प्रेम आहे. लोक इथे अजून ही परंपरा जपतात आणि प्राचीन संस्कृतीला जगासमोर मांडतात. माझ्या या भारत भूमीला थोर व महान संत व वीरपुरुष लाभली आहेत.

माझ्या देशाने आज जवजवळ प्रत्येक क्षेत्रात प्रगती केली आहे. आज संपूर्ण जगात भारताला सन्मानाने ओळखले जाते. इतकी प्रगती करून सुद्धा आपल्या देशातील लोक आपल्या मातृभूमिला विसरली नाहीत आणि सतत देशाचा सन्मान वाढवण्यासाठी प्रयत्न करत असतात, म्हणून मला इकडच्या लोकांवर आणि माझ्या देशावर खूप प्रेम आहे.

Similar questions