मूकं करोति वाचालम्
अक्कलकोट जवळ मैदरगी नावाचे गाव आहे. तेथे स्वामींचा एक निस्सीम भक्त रहात होता. स्वामी मैदरगीला आले की तो त्यांची सेवा करायचा. त्याला दोन मुलगे आणि तीन मुली होत्या. दुर्देवाने सगळी मुले वेडसर होती. त्यापैकी मन्याबा नावाचा मुलगा वेडसर तर होताच, पण मुकाही होता. त्याचे स्वामींवर निरतिशय प्रेम होते. त्या ब्राम्हणाने आपली व्यथा कधीही स्वामींना सांगितली नाही. दैवयोगाने ब्राम्हण, त्याची पत्नी आणि पाचापैकी चार मुले एका साथीच्या आजाराने एकाएकी गेली. फक्त मन्याबा वाचला. तो वेडा आणि मुका असल्याने त्याला काहीही समजत नव्हते. त्याला कोणाचाही आधार उरला नव्हता. त्याचे खूप हाल होऊ लागले. स्वामींना हे अंतर्ज्ञानाने समजले. स्वामींनी त्याला आधार दयायचे ठरविले.
एकदा स्वामींचे काही भक्त दर्शनासाठी अक्कलकोटला जायला निघाले. स्वामींच्या प्रेरणेने ते मन्याबाला अक्कलकोटला घेऊन आले. स्वामींनी त्याच्याकडे कारूण्यपूर्ण नजरेने पाहिले आणि म्हणाले, “अरे वेडया, या शहाण्यांच्या जगात तुझे कसे होणार?” तेव्हा मैदरगीची भक्त मंडळी स्वामींना म्हणाली, “महाराज त्याला कुणीच नाही. तुम्ही याचे वेड घालवा. त्याला वाणी नाही. त्याला चार शब्द बोलता येतील असे करा.”
स्वामी त्या क्षणी काहीच बोलले नाहीत. त्या मंडळींनी मन्याला परत स्वामींच्या चरणांवर घातले व सर्वजण मैदरगीला निघून गेले.
तेव्हापासून मन्याबाला स्वामींचे कृपाछत्र मिळाले. तो त्यांच्या कृपाछत्राखाली वाढू लागला. स्वामींनी त्याला (वाणी) वाचा दिली. तो मराठी व कानडी या दोन भाषांमध्ये अचानक बोलू लागला. त्याने दोन्ही भाषा लौकरच आत्मसात केल्या. स्वामींनी त्याचे वेड घालवले पण त्याला साधकावस्था प्राप्त करून दिली. स्वामीनामात तो दंग राहू लागला. स्वामींच्या कृपेने त्याला सिध्दी प्राप्त झाल्या. त्याची गावात प्रतिष्ठा वाढली. लोक त्याच्याकडे येऊन त्याला प्रश्न विचारू लागले. आपले काम होईल का असे विचारायचे. मन्याबाने ‘होईल’ म्हटले तर निश्चित काम व्हायचे. मन्याबा ‘नाही होणार’ असे म्हटल्यावर लोक काम होण्यासाठी त्याला आग्रह करायचे. तेव्हा मन्याबा म्हणायचा, “स्वामी मला मारतील.” मन्याबाला काहीच कळत नव्हते. परंतु स्वामींनी त्याला वाणी देऊन बोलायला शिकविले होते. त्याला जगण्यासाठी एक साधन दिले होते, आता तो ‘सिध्द पुरूष’ म्हणून ओळखला जाऊ लागला.
Answers
Answered by
0
.....................
I am sorry
Similar questions