मी किल्ली बोलतो निबंध
Answers
Explanation:
नमस्कार, मित्र मंडळी! गडेहो!
ओळखलंत का? आतापर्यंत कित्येकांच्या वाणीतून मी बोललो. कित्येकांनी माझ्यावर लेखणी चालवली, माझे सुखदुःख त्या लेखणीत उतरवले. याचा फरक पडत गेला. अनेकजण माझ्या अस्तित्वाचे महत्त्व पटवून देण्यास झटत आहेत. माझ्या प्रत्येक चिऱ्यामधून छत्रपती शिवाजी महाराजांच नाव येतं माहितेय? आत्मा, बुद्धी ध्यानीमनी ठेऊन ऐकलत तर हा आवाज तुमच्या कानी येईल. हो, मीच तो किल्ला! मी दुर्ग बोलतोय!
इतिहासात माझं स्थान काय होतं माहितेय? शिवकाळात रामचंद्रपंत अमात्य माझ्याविषयी आज्ञापत्रात लिहतात, ‘संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग, दुर्ग नसता परचक्र येताच मोकळा देश निराश्रय, प्रजाभग्न होऊन उध्वस्त होतो…. गडकोट हेच राज्य, गडकोट म्हणजे राज्याचं मूळ, गडकोट म्हणजे खजिना, गडकोट म्हणजे सैन्याचं बळ, गडकोट म्हणजे राज्यलक्ष्मी, गडकोट म्हणजे आपली वस्तीस्थळे, गडकोट म्हणजे सुखनिद्रागार, किंबहुना गडकोट म्हणजे प्राणसंरक्षण.’ तसे माझे अस्तित्व राष्ट्रकूट, चालुक्य, यादव काळातले नंतरच्या काळात पाच शाह्या, शिवकाळ अन पेशवेकाळ. याकाळामध्ये माझ्या बांधणीत शत्रूपासून रक्षण व्हावे म्हणून वेळोवेळी महत्त्वपूर्ण बदल होत गेले. यावेळी अनेकांनी राज्य केलं, पण माझ्या रयतेचं राज्य मानणारा शिवाजीराजा इथं जन्मला… मला आपुलकीची भावना याच काळात मिळाली. मराठ्यांच्या दुसरे छत्रपती शंभुराजेंना फितुरीचा शाप लागला आणि त्याची क्रूर औरंगजेबाने हत्या केली. त्यावेळी पासून मला उतरती कळा लागली. माझे नाव बदलले गेले, माझ्या राजाचं सुवर्णसिंहसन अवघ्या रयतेने स्वीकारलेलं सिंहासन माझ्या डोळ्यादेखत औरंगजेबाने फोडले! किती किती यातना मला झाल्या, माझे सदर, वाडे, समाध्या, तटबंदी, असे महत्वपूर्ण अंग तोफांच्या गोळ्या झाडून इंग्रजांनी व मोगलांनी फोडल्या… पुढे इंग्रजांच राज्य आल्यावर त्यांनी माझ्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या रयतेला माझ्याकडे येणाऱ्या वाटा बंद केल्या. तरीही छत्रपतींच्या पावलांच्या स्पर्शाने पावन झालेलो मी, डगमगलो नाही, जागचा हललो नाही, सहन करत राहिलो; कारण मला माहित होतं माझ्यावर अन राजावर प्रेम करणारी मावळे अजूनही आहेत. किंबहुना, इथल्या मातीत जन्मणारा मला कधी विसरुच शकत नाही.
आता माझ्यावर असे हल्ले होत नाहीत, तो काळ संपला. अनेक अबालवृद्ध व्यक्ती मला पहायला येतात त्यावेळी खूप आनंद होतो. किशोरवयीन मुले, मुली माझ्या अंगाखांद्यावर खेळतात त्यावेळी मी हरकून जातो बघा! ६०-८० वर्षाची आजी कडा चढताना, गड चढताना पाहून मला ‘हिरकणी’ आठवते… मात्र हे करत असताना जागरूक रहा, सावधानता पाळा, सुरक्षितता बाळगा गडेहो! पण जेव्हा तरुण वयातील मुले नशेच्या आहारी जाऊन इथे दारूच्या बाटल्या आणतात, माझ्या दगडावर नावं लिहतात, अश्लील चाळे करताना दिसतात, अश्लील गाणी लावून दंगा करताना दिसतात त्यावेळी यांचा मला याच गडावरून कडेलोट करू वाटतो बघा… महाराजांनी किल्ले बांधले पण एकाही किल्ल्यावर त्यांनी स्वतःचं नाव लिहलं नाही. आणि हे? यांची लायकी दाखवतात.. माझ्या स्वच्छ, निर्मळ , थंडगार असणाऱ्या पाण्याच्या टाक्यात पोहताना सुद्धा दिसतात. पण यावेळी मी पूर्णतः हतबल होतो. एक विनंती तुम्हा मावळ्यांना की, गडावर आल्यावर माझं पावित्र्य तेवढं राखा.. माझ्या अंगा, खांद्यावर खेळा पण एकही चिरा/दगड ढासळू देऊ नका, मला कोणतीही इजा करू नका.
या नैसर्गिक ऊन, वारा, पाऊस या माऱ्यापुढे मी झिजत चाललो आहे. माझ्या चिऱ्यातून तो ‘छत्रपती शिवाजी महाराज’ हा आवाज कमी होत चालला आहे. हो, कमीच! तटबंदी उगवलेले वृक्ष, झाडांमुळे माझा श्वास कोंडतो आहे. माझे बुरुजांसारखे बाहू ढासळत आहेत. टाक्यात गाळ, माती साचून भरून गेली आहे. सरकारच थोडंफार लक्ष असत माझ्यावर पण विकासकामाच्या नावाखाली माझी गैरसोय केली जाऊ पाहत आहे. गडावर हॉटेल्स, लग्न समारंभ होतील अस म्हंटल जात, याला तुम्ही मावळे छातीचे कोट करून नक्कीच विरोध करतील. अन माझे पावित्र राखतील असा मला विश्वास आहे. मला प्रचंड इरमार तर तेंव्हाच वाटतो, ज्यावेळी माझी हक्काची माणसं दुर्गसंवर्धनास येतात, टाक्यात साचलेली माती काढतात मग पुन्हा ते टाकं पावसाच्या पाण्यानं भरतं, गडावर वृक्षारोपण करतात तेंव्हा मी ताजा श्वास घेऊ लागतो, तटबंदीतील झाडे तोडता ना त्यावेळी अडकलेला माझा श्वास मोकळा होतो बघा… जेंव्हा ऐतिहासिक पावित्र राखून इथलं मंदिर बांधता ना तेंव्हा गडावरील देवीचा जागर होतो, महादेवाला अभिषेक होतो… शिल्प, समाध्या, देवळं, भग्नावशेष पुन्हा रचले जातात; तेंव्हा इथल्या दंतकथा, लोककथा पुन्हा कानी ऐकावयास पडतात… जेंव्हा नवीन दरवाजा बसवताना तेंव्हा मी पुन्हा एकदा खरंच बोलू लागतो… अशी दुर्गसंवर्धनात मेहनत करणारी पोरं, गडरहाळातील माझी डागडुजी करणारे व्यक्ती, अनेक दुर्गसंवर्धन संस्था पाहतो ना, जेंव्हा फक्त गड पाहण्यासाठी न येता येथील ऐतिहासिक, भौगोलिक पार्श्वभूमीचा अभ्यास करून येतात ना… तेंव्हा खरंच मी आनंदाने रडू लागतो.. माझ्याकडे भटकंतीला, सह्याद्रीतील सुख मिळवायला येता ना? मग माझ्यासाठी काहीच करणार नाही का? पुढील पिढ्यांसाठी मला माझे अस्तित्व टिकवण्यास मदत नाही का करणार? मग मी निश्चितच म्हणू शकेल, माझे शिवरायांचे मावळे अजूनही आहेत जे “माझ्याशी संवाद साधतील” .
माझे मनोगत आवडल्यास प्रत्येक मावळ्यापर्यंत सामायिक करा. जेणेकरून मला होणारा त्रास, हर्ष-उल्हास, आनंद,लोभ, मत्सर, काळजी,वेदना कळतील; कारण मी टिकलो तरच इतिहास टिकेल.
#राज्याचे_सार_ते_दुर्ग
plz mark inbrainlist