मी केलेली सहल, आमची सहल मराठी निबंध, भाषण, लेख
Answers
गेल्याच महिन्यात शाळेतून राणीच्या बागेत आमची सहल काढण्यात आली. पूर्वीची राणी बाग आणि आताची यामध्ये फरक दिसला.
निसर्गरम्य अशा राणी बागेत हत्तीने आमचे स्वागत केले. जिराफ, गेंडा, झेब्रा, हरीण, काळवीट, मोर, लांडोर ह्यांचा सह वाघ, सिंह, अस्वल, कोल्हा आराम करत होते. माकड उड्या मारत होती. रंगीत पक्षी सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होते. दुपारच्या जेवणानंतर जलचर प्राणी पाहण्याचा आनंद घेतला, ते सगळं चित्र डोळ्यात साठवून संध्याकाळी आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला निघालो.
*आमची सहल*
गेल्या महिन्यात आमची सहल कार्ला लेणी येथे नेण्यात आली होती. आमचे शिक्षक आणि वर्गातील मुले मिळून आम्ही १०० जण सहलीला गेलो होतो. पहाटे ६ वाजता आमची बस शाळेतून निघाली आणि गाणी गुणगुणत आम्ही कार्ला लेणीच्या पायथ्याशी पोहोचलो. बस मधून उतरून आम्ही लेणीच्या पायऱ्या चढू लागलो. डोंगर चढून लेणीचा दरवाजा दिला आणि आम्ही सगळे आत गेलो. तिथल्या लेणीच्या कोरीव काम पाहून डोळे अगदी दिपून गेले होते. आत एक मोठी भिंत होती ज्यावर मूर्ती काम केले होते. असे मानले जाते जर तिथे आपण एक नाणं फेकलं आणि ते परत नाही आलं तर आपली इच्छा पूर्ण होते.
लेणीच्या बाजूलाच एकविरा आईचे मंदिर आहे. एकविरा आई आगरी-कोळी समाजाचे आराध्य दैवत आहे. अनेक भाविक तिथे दर्शनाला आले होते. आम्ही सुद्धा देवीचे दर्शन घेतले आणि तो पर्यंत दुपार झाली होती.
दुपारी जेवण झाल्यानंतर आम्ही लोणावळ्याच्या बाजारात फिरलो आणि आम्हाला हव्या त्या गोष्टी विकत घेतल्या.
सायंकाळी आम्ही परतीचा प्रवास केला.
मी व माझा मित्रांनी खूप मजा केली. मला ही सहल नेहमी लक्षात राहील.