India Languages, asked by rajenupadhyay8, 11 months ago

मी केलेले श्रमदान मराठी निबंध​

Answers

Answered by Hansika4871
5

अन्नदान, रक्तदान ह्यांच्या बरोबरीने श्रमदान देखील खूप महत्त्वाचे आहे. श्रमदान हे एकट्याने किंवा संघटित पणे करता येतं. जे काम एकट्याला शक्य नसतं ते संघटित पणे करून, श्रम करून साध्य करता येतं. एकत्रित पणे श्रम केल्याने परिश्रम कमी लागतात, वेळ कमी लागतो आणि गोष्ट लवकर साध्य होते.

पावसाअभावी शेतकऱ्यांचे हाल होत असताना एकत्रित पणे जमिनीत मारलेले खड्डे म्हणजेच शेततळी कालांतराने पाण्यानी भरून नंतर ती शेतकऱ्यांना उपयुक्त ठरलेली आहेत.

ह्याचा अर्थ असा होतो की श्रमदानतून फायदा घेता येतो पण त्यासाठी एकत्र येणे गरजेचे असते

Answered by ItsShree44
7

Answer:

समाजसेवेच्या तासाला गुरुजींनी सांगितले, आपण प्रत्येकजण समाजाचे ऋण लागतो आणि ते ऋण आपण कोणत्या ना कोणत्या रूपाने फेडलेच पाहिजे." बालवीर संघटनेने आम्हांला शिकवले की, प्रत्येक बालवीराने रोज काहीतरी सत्कृत्य केलेच पाहिजे. आमच्या अभ्यासक्रमात 'समाजसेवा' हा विषयही नेमलेला आहेच. तेव्हापासून सतत माझ्या मनात येई की, आपण याबाबत काय करू शकतो? माझ्या इच्छेनुसार तशी संधी चालून आली. आमच्या शहरापासून जवळच आदिवासींचा एक पाडा आहे. एका सामाजिक संस्थेने त्या वस्तीत एक शाळा चालवली आहे. या शाळेची इमारत बांधली जात आहे. विशेष गोष्ट म्हणजे शहरातील काही सेवाभाव मि लोक ठरवून त्या वस्तीत जातात आणि बांधकामाच्या कामात मदत करतात. आमच्य गुरुजींनीही दोन दिवसांच्या कामाची जबाबदारी स्वीकारली. राज्य परिवहन महामंडळाच्य दोन बसेसमधून आम्ही शंभर विदयार्थी व सहा शिक्षक तेथे गेलो. त्या इमारतीचे बांधकाम एका निष्णात स्थापत्यविशारदाच्या मार्गदर्शनाखाली चालू होते. .

आम्ही त्या वस्तीवर पोहोचलो, तेव्हा सकाळचे नऊ वाजले होते. लगेच कामाची वाटणी करण्यात आली. त्यानुसार आमचे गट पाडण्यात आले. आम्हांला काम शिकवण्यासाठी सहा गवंडीही होते. आम्ही विटा घमेल्यांत भरून त्यांना नेऊन देत होतो. विटा निवडणे, त्या भिजवणे, त्या घमेल्यांत भरणे, कामाच्या जागेवर नेऊन देणे, रिकामी घमेली परत आणणे ही कामे काही गटांकडे होती, तर काही जण रेती, सिमेंट यांचे मिश्रण करून त्या कारागिरांना देत होते.

मात्र आम्हांला शारीरिक श्रमाचे काम करण्याची सवय नसल्याने लवकरच आम्ही थकून गेलो. काहीजणांच्या हातून घमेली पडली, कुणाला लागलेही; पण आता माघार घ्यायची नाही, श्रम करायचेच या निर्धाराने सर्व विदयार्थी काम करत होते. कुणीतरी गाणी म्हणायला सुरुवात केली आणि मग काम झपाट्याने होऊ लागले. त या गवंडी कामगारांचे भिंत बांधण्याचे, ओळंबा लावण्याचे काम आम्ही करून पाहिले. पण ते कुठले जमायला? 'जेनु काम तेनु थाय, बिजा करे सो गोता खाय' असे म्हणतात ते उगाच नाही!

अंगमेहनतीचे काम केल्यामुळे सपाटून भूक लागली. झुणका-भाकरीचा मस्त बेत होता. त्यावर आम्ही ताव मारला. रात्री शेकोटीभोवती बसलो असताना आदिवासी मुलांनी त्यांची गाणी गाऊन दाखवली. दोन दिवस केव्हा संपले ते कळलेच नाही. परतताना गुरुजी म्हणाले, “मुलांनो, तुम्ही आज श्रमदान केलेत, समयदान केलेत. हीच सवय नेहमी ठेवा म्हणजे तुम्ही देशाचे उत्तम नागरिक व्हाल." गुरुजींचा उपदेश मनात घोळवतच आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो.

Similar questions