India Languages, asked by pawarpriti9019910, 3 months ago

मी कोन होणार निबंध मराठी​

Answers

Answered by avinashmaurya261
2

कोणत्याही शाळेत हमखास एक निबंध लिहायला सांगितला जातो... ‘मी पंतप्रधान झालो तर... किंवा मी कोण होणार... या दोन निबंधाने मुलांवर फारच मोठे ओझे टाकले आहे. कोणीही पाहुणा घरी किंवा शाळेत आला तर हमखास एक प्रश्न मुलांना विचारणारच, तू कोण होणार. मुलेही हमखास सर्वांना आवडणारी उत्तरे पाठ करून ठेवतात. पंतप्रधान, मुख्यमंत्री, डॉक्टर, वकील ही तर ठरलेली. थोडक्यात जे पद प्रतिष्ठेचे असेल, जे पद प्रसिद्धी मिळवून देणारे असेल, अशा पदांवर मुलांनी जावे असा शाळांचा संस्कार असतो. शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचे कौतुक करताना अशाच विद्यार्थ्यांचा उल्लेख केला जातो की जी मुले पुढे प्रसिद्ध झाली. अशांनाच शाळा मिरवते. शाळेतून शेतकरी, सुतार असे प्रामाणिक माणसे निपजली असतील तर त्यांना शाळा ओळख देत नाहीत. त्यातही जर शाळेचे माजी विद्यार्थी राजकारणी असतील तर शाळेत सन्मान होतो. पुरस्कार मिळवलेल्या माजी विद्यार्थ्यांचा सन्मान होतो. घरातही तेच असते. लग्नाचे स्थळ बघण्यापासून तर सर्वत्र केवळ प्रसिद्ध झालेल्यांचीच पूजा आपण करतो.

कृष्णमूर्ती या मुळावरच आघात करतात. अशा प्रकारचे ऐहिक प्रसिद्धी मिळवण्याच्या प्रेरणा रुजवणार्‍या शिक्षणावर ते टीका करतात. ते म्हणतात... आजचे शिक्षण हे कुजके आहे कारण ते तुम्हाला फक्त यशावर प्रेम करायला शिकवते...

खरे जीवनाचे उद्दिष्ट हे केवळ आपण समाजाला आवडणारे एक बहिर्मुख व्यक्ती बनणे एवढेच आहे का... या साच्यात फिट आपण आपल्या मुलांना बसवतो आणि मुले उच्चपदस्थ अधिकारी किंवा राजकारणी होण्यासाठी अहोरात्र झटतात. त्यामुळे केवळ करिअरच्या स्पर्धेने ग्रासलेली चुकीची प्रणाली मुलांवर थोपवली जाते.

Similar questions