मी क्रीडांगण बोलतोय मराठी निबंध in 1000 to 2000 words
Answers
Answer:
I not know mardhy you languages
■■ "मी क्रीडांगण बोलतोय"■■
कसे आहात, मुलांनो ?? मी तुमचा साथी, तुमच्या शाळेतील सर्वात आवडती जागा," क्रीडांगण" बोलतोय. आता मुलांना सुट्टी आहे, म्हणून तुमच्याशी बोलायला मला वेळ मिळाला.
माझ्यावर अनेक स्पर्धा खेळल्या जातात. क्रिकेट, कबड्डी, खोखो, फुटबॉल, धावण्याची शर्यत, असे वेगवेगळे खेळ माझ्यावर खेळतात. शाळेच्या क्रीडादिनाच्या दिवशी तर मला छान सजवले जाते. त्यादिवशी मी खूप खुश असतो.
माझ्यावर बरेच मुले खेळताना पडतात. त्यांना लागल्यावर मला फार वाईट वाटते. त्यांना रडताना पाहून मला त्यांचे अश्रु पुसावेसे वाटते.
पण, ही मुले पडल्यावर स्वतःहून उभे राहतात,स्वतःचे अश्रु पुसून पुन्हा खेळू लागतात, तेव्हा मला खूप आनंद होतो. मला अभिमान वाटते की त्यांना जीवनाच्या कसोटीसाठी मी तैयार केले आहे.
मुलांनो, तुम्ही माझ्यावर खेळत असताना तुम्ही खूप हसता, तुम्हाला खूप मजा येते. तुम्हाला खुश पाहून मी सुद्धा खुश होतो. पण, मला तुमच्याशी फक्त एकच तक्रार आहे.
तुमच्यामधील काहीजण मला स्वच्छ ठेवत नाही. माझ्यावर पेपर, चॉकलेटचे कागद टाकता, कधीकधी माझ्या अंगावर थूकता. तेव्हा मला फार वाईट वाटते.
मी तुमच्याकडून हीच आशा करतो की तुम्ही मला साफ व स्वच्छ ठेवा.मग मी सुद्धा तुम्हाला हसवण्याचे, खेळवण्याचे काम आनंदाने करत राहणार.
चला आता निरोप घ्यायची वेळ आली.पुन्हा भेटू.