मी क्रीडांगण बोलतोय वर निबंध
Answers
Answer:
मोठ्या प्रमाणात वेगाने चाललेल्या यंत्रयुगामुळे लोकांचे हल्ली खेळाकडे दुर्लक्ष होत चालले आहे. आजकाल कित्येक अशीच मोठंमोठी क्रिडांगणे पुर्ण रिकामी रिकामीच दिसतात. साधं चिटपाखरूही त्या क्रिडांगणाकडे फिरकेना. तरूण मुलांचा कल मोठ्या प्रमाणात स्मार्टफोनवरील गेम्सकडे वळला आहे.
काल सहज क्रिडांगणावर गेलेलो. एका कडेला झाडाखाली बसून फोनवर फेसबुक उघडून चाळत होतो. अचानक मला कुणाच्यातरी रडण्याचा आवाज ऐकू आला. मी चकीत होऊन इकडे-तिकडे पाहू लागलो. ते क्रिडांगण माझ्याशी बोलत होते. मी त्याच्या समोर गेलो तर क्रिडांगणाचा एक कोपरा रडताना मला दिसला. मी थोडसं जवळ जाऊन तिथेच बसून त्याला काय झालय त्याबद्दल विचारू लागलो. मग तो मला त्याची सर्व कहाणी सांगू लागला.
फार फार वर्षांपूर्वी कुणा एका मोठ्या दयाळू सावकाराने हि जागा मैदानासाठी दान म्हणून देऊन टाकली. इथे हे मोठे क्रिडांगण तयार झाले. मग इथे नित्यनियमाने मुले नवनवीन खेळ खेळू लागले. माझ्यासोबत दिवसरात्र ते खेळ चालत असत. मला त्यांना आपल्या अंगा खांद्यावर खेळू द्यायला खूप आवडायचे. त्या मुलांशी माझ्या गप्पा खूपवेळ चाले. माझ्यासोबत रंगताना त्यांना तहान-भुकही ना लागे. सर्वकाही विसरून ते फक्त माझ्यात स्वतःला समर्पण करायचे. मलाही त्यांची संगत खूप आवडे. मी पाहिलेला खेळ – मराठी निबंध, भाषण, लेख
माझ्या अंगाखांद्यावर खेळून क्रिकेटचा देव मानला जाणारा सचिन साय्रा जगाला कळला. मला त्या गोष्टीचा खरच खूप अभिमानाने वाटतो. हॉकीसारखा खेळ आपल्या देशाचा खेळ माझ्यामुळेच बनला याचे मला खरेच कौतुक वाटते.
माझ्या चहूबाजूला असणारी हि डेरेदार वृक्षांची केलेली लागवड. खरचं माझं सौंदर्य खुलवून देते… दमलेला खेळाडू तिच्या सावलीत क्षणासाठी विसावून पुन्हा खेळण्यास तयार होतो. रोज सकाळी ज्येष्ठ नागरिक इथे येऊन मस्त फेरफटका मारतात… त्यांच्या गप्पांना माझ्यामुळेच रंगत येते. मीही त्यांच्या गप्पात नकळत सामिल होतो. पण काही वर्षापासून होणारा हा कचरा, व घरातील घाण इथे आणून टाकल्याने माझं सौंदर्य खालावत चाललय. माझा आवडता खेळ- कबड्डी मराठी निबंध, भाषण, लेख
त्यातच आता वृक्षतोड मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे माझ्या आजूबाजूंचा परिसर ओकाबोका बनला आहे. यांमुळेच माझ्या अंतर्मनाला जखमा होतात.. मला खूप वाईट वाटत. चौपदरी होणाय्रा रस्त्यामुळे आता माझी जागा बळकावत चालली आहे. आता माझं अस्तित्व नाहीसं होऊन जाईल. माझ्यावर मोठं मोठ्या बुलडोझरचा प्रहार झाल्यावर मी कायमचा संपून जाईन.
मला कसली अपेक्षा नाहीये…. फक्त मला असेच राहुदे… माझ्यामुळेच तुमच्या मुलांची शारिरीक क्षमता सुधारते. तुमची मुले खुश राहण्यास थोडाफार माझाही सहभाग असतो. मग मला काही वर्ष जगू दे… मला जगात सगळ्यांना क्रिडांचे महत्त्व सांगू दे.. हि पिढी पुर्ण यंत्राच्या मागे ओढली जातेय… त्यांच्या आयुष्यात मला क्रिडांगण हा विषय जोडू दे. जीवनात खेळाचे महत्त्व निबंध, भाषण, लेख मराठीमध्ये
मला फाडून माझ्यातून वेगवेगळे मार्ग काढू नका… मी माझाच राहणार नाही. डोळ्यातून आकंठ वाहणाऱ्या धारा पुसता पुसता क्रिडांगण माझ्याशी त्याची करूण कहाणी सांगत होता. मी त्याची कहाणी ऐकत होतो. इतक्यात दुरून मला बुलडोझर येताना दिसला. क्रिडांगण मला हात जोडून तिथेच गडप झाले.. कदाचित तो त्याचा शेवटचा निरोप असावा!
तर अशाप्रकारे आम्ही या लेखामध्ये तुम्हाला मी क्रीडांगण बोलतोय या विषयावर आत्मवृत्तपर निबंध, भाषण दिलेले आहे. तुम्हाला जर हा आत्मवृत्तपर निबंध, भाषण आवडले असेल तर कमेंट्स सेक्शन मध्ये तुमचं मत कळवा. धन्यवाद.