Science, asked by Annasaheb, 9 months ago

मुक्त जनित्र मनजे काय

Answers

Answered by msri67709
2

Explanation:

विद्युत् जनित्र : यांत्रिक ऊर्जेचे विद्युत् ऊर्जेत रुपांतर करणारे साधन. जेव्हा एखाद्या संवाहक वेटोळ्याशी संलग्न असणाऱ्या चुंबकीय क्षेत्ररेषांची संख्या बदलत असते अथवा संवाहक व चुंबकीय क्षेत्र यांमधील सापेक्ष गतीमुळे संवाहकाकडून क्षेत्ररेषा कापल्या जात असतात, त्या वेळी संवाहकाच्या दोन्ही टोकांमध्ये विद्युत् दाब निर्माण होतो, या तत्वावर विद्युत् जनित्राचे कार्य चालते. कोणत्याही उपलब्ध ऊर्जेचे रुपांतर विद्युत् ऊर्जेत करणारी साधने ही मूलतःएक प्रकारची जनित्रेच होत. जसे विद्युत् घट (रासायनिक उर्जेचे विद्युत् ऊर्जेत रुपांतर), सौर घट (सौर ऊर्जेचे विद्युत् ऊर्जेत रुपांतर), प्रकाशविद्युत् घट (प्रकाश ऊर्जेचे विद्युत् ऊर्जेत रुपांतर), इंधन विद्युत् घट (इंधनातील ऊर्जेचे विद्युत् ऊर्जेत रूपांतर), तापविद्युत् (औष्णिक ऊर्जेपासून वीजनिर्मिती) इत्यादी. व्यवहारात मात्र सर्वसामान्यपणे ‘विद्युत् जनित्र’ यावरुन गतिजन्य विद्युत् चालक प्रेरणा (वि. चा. प्रे. विद्युत् मंडलात प्रवाह वाहण्यास करणीभूत होणारी प्रेरणा) निर्मिणाऱ्या यंत्रांचाच बोध होतो.

आ. १. फॅराडे-चकती प्रकारचे जनित्र : (१) नालाकृती चुंबक, (२) उत्तर ध्रुव (उ), (३) दक्षिण ध्रुव (द), (४) गॅल्व्हानोमीटरला जोडलेल्या तारा, (५) तांब्याची फिरणारी चकती, (६) चुंबकीय क्षेत्र.

आ. १. फॅराडे-चकती प्रकारचे जनित्र : (१) नालाकृती चुंबक, (२) उत्तर ध्रुव (उ), (३) दक्षिण ध्रुव (द), (४) गॅल्व्हानोमीटरला जोडलेल्या तारा, (५) तांब्याची फिरणारी चकती, (६) चुंबकीय क्षेत्र.

इतिहास : इ. स. पू. ६०० च्या सुमारास थेलीझ यांना असे दिसून आले की, अंबर घासले असता हलक्या वस्तू त्याच्याकडे आकर्षिल्या जातात म्हणजे त्याच्यावर स्थिर विद्युत् निर्माण होते. यानंतर सु. अडीच हजार वर्षे घर्षणजन्य (स्थिर) विद्युत् निर्माण करणाऱ्या यंत्रामार्फतच वीज निर्माण करण्यात येई. इ. स. १८०० साली आलेस्सांद्रो व्होल्टा यांनी आद्य प्रकारची विद्युत् घटमाला शोधून काढली. ही विद्युत् घटमाला म्हणजे व्यवहारात वापरण्यायोग्य असा विद्युत् प्रवाहाचा पहिला स्त्रोत होय. विद्युत् व चुंबकत्व यांत परस्पसंबंध असतात, असे १८२० साली हॅन्स क्रिश्चन ओर्स्टेड व डॉमीनीक फ्रांस्वा ॲरागो यांना दिसून आले.

Similar questions