History, asked by vaishalithorat25584, 5 months ago

मुलीचे शिक्षण पगतीचे लक्षण​

Answers

Answered by yashingale515
0

Answer:

हे विधान योग्य आहे,कारण मुलगी शिकली तर दोन कुटुंब शिक्षित होतात.

Answered by Aryabhalke
4

Answer:

खरं पाहता, आज महाराष्ट्र शासनाने मुलींना पहिलीपासून पदवीपर्यंतच्या शिक्षणाची मोफत व्यवस्था केली आहे. त्याशिवाय ‘सावित्रीबाई दत्तक बालक’ योजनेतून तिला शिक्षणासाठी येणाऱ्या इतर खर्चासाठी मदत मिळू शकते. त्यामुळे आज शहरातून मुली, स्त्रिया शिक्षण घेताना आढळतात. आज कित्येक कर्तबगार स्त्रिया जबाबदारी पदे सांभाळत आहेत. कर्तृत्वाचे कोणतेही क्षेत्र आज स्त्री हुशारीने सांभाळू शकते, हे स्त्रीने सिद्ध केले आहे. तरीही आपल्या देशातील स्त्रीशिक्षणाची समस्या कठीण का झाली आहे?

Explanation:

एक सुशिक्षित आई ही शंभर शिक्षकांपेक्षा श्रेष्ठ आहे,’ हा आपल्या राष्ट्रपित्याचा संदेश अनमोल आहे. कारण ज्या घरातील स्त्री शिकलेली आहे, ते घर कधीच अशिक्षित राहणार नाही. तरीपण आजही देशातील स्त्री- साक्षरतेचे प्रमाण हे पन्नास टक्क्यांपेक्षाही कमी आहे. ह्या लेखामध्ये आम्ही मुलींचे शिक्षण प्रगतीचे लक्षण, काळाची गरज, समाजाचे रक्षण, मुलगी शिकली प्रगती झाली ह्या विषयांवर माहिती दिली आहे. हि माहिती तुम्हाला मुलींचे शिक्षण प्रगतीचे लक्षण, काळाची गरज, समाजाचे रक्षण, मुलगी शिकली प्रगती झाली ह्या विषयांवर मराठी मध्ये निबंध, भाषण, लेख, परिच्छेद लिहण्यास मदत करेल. चला तर मग सुरु करूया.

for your help

Similar questions