Art, asked by vikramchaure86, 11 months ago

मुलाखत घेण्यासाठी प्रश्नावली तयार करा.

1) भाजीवाला

2) पोस्टमन

Answers

Answered by rajraaz85
6

Answer:

भाजीवाला ची मुलाखत घेण्यासाठी प्रश्नावली.

सर्वात आगोदर भाजीवाल्या चे स्वागत करणे.

१. तुमचे नाव सांगा? व तुम्ही या क्षेत्रात किती वर्षापासून काम करत आहात ते सांगा?

२. साधारणत: प्रत्येक जण नोकरीच्या मागे पळत असतो, पण अशी कुठली गोष्ट आहे की ज्यामुळे तुम्ही भाजीपाला या व्यवसायाकडे वळाले?

३. दिवसातून किती तास तुम्हाला या व्यवसायासाठी द्यावे लागतात? व त्यासाठी तुमचे नियोजन कसे असते?

४. तुमच्या व्यवसायात तुम्ही कोण कोणत्या भाज्यांचा समावेश करतात?

५.भाजीपाला घेणाऱ्या लोकांचा तुम्हाला कसा अनुभव आलेला आहे?

६. या तुमच्या व्यवसायातून दिवसाला किती कमाई होते? व ती रक्कम संसार चालवण्यासाठी पुरेशी ठरते का?

७. तुम्ही दुसऱ्यांना या व्यवसायाकडे वळण्यासाठी प्रोत्साहन देणार का?

८.  भाजीपाला व्यवसाय करण्यासाठी कुठल्या तीन गोष्टी महत्त्वाच्या असतात?

९. बदलणाऱ्या ऋतूनुसार तुम्ही भाजीपाल्यामध्ये बदल करतात का?

१०. भविष्याच्या दृष्टीने आपल्या व्यवसायाबद्दल तुम्ही काय नियोजन केले आहे का?

पोस्टमन ची मुलाखत घेण्यासाठी प्रश्नावली.

सर्वात अगोदर पोस्टमनचे स्वागत करणे.

१. तुमचे नाव सांगा? व या क्षेत्रात तुम्ही किती वर्षापासून काम करत आहात ते सांगा?

२. या नोकरीकडे वळण्यास तुम्हाला कशी प्रेरणा मिळाली?

३. बदलत्या काळानुसार तुमच्या नोकरीत व व्यवसायात काय बदल झाले?

४. आजही लोक एकमेकांना पत्र पाठवतात का?

५. दिवसातुन तुम्ही किती तास टपाल वाटण्यात घालवतात?

६. दररोज तुम्ही वेगवेगळ्या लोकांना भेटत तुमचा लोकांबद्दल चा अनुभव सांगा?

७. तुमची ही नोकरी सांभाळून तुम्हाला कुटुंबाला किती वेळ देता येतो?

८. पोस्ट ऑफिस च्या कार्यालयात काय काय बदल करण्याची गरज आहे?

९. तुम्ही लोकांना काय सांगाल?

Answered by hiteshrahangadale495
3

Answer:

mulakhat namuna tayr kra

Similar questions