World Languages, asked by vijaytabib9, 10 months ago

मुलगा मुलगी एक समान 10 line निबंध मराठी ​

Answers

Answered by rajraaz85
12

Answer:

आज प्रत्येक क्षेत्रात जसे की, डॉक्टर, इंजिनियर, पायलट, वकील अशा अजून बऱ्याच क्षेत्रात आपल्याला मुलांच्या बरोबरीने मुली काम करताना पहावयास मिळतात. एवढेच नसून हॉटेलमधले स्वयंपाकी सुद्धा पुरुष असतात आणि जिल्हाधिकारी सुद्धा महिला असतात. म्हणजे पुरुषांचे काम महिला करू शकतात आणि महिलांचे काम पुरुष करू शकतात.

आज कित्येक क्षेत्रात उच्च पदी असलेल्या माणसांच्या यादीत पुरुषां प्रमाणे महिलांचा देखील तेवढाच समावेश या यादीत असतो. मुलगा-मुलगी हे आधीपासून एक समान आहेत फरक एवढाच आहे की आधी या विचाराकडे नकारात्मक दृष्टीने पाहिले जायचे आणि आज या विचाराकडे सकारात्मक दृष्टीने पाहिले जाते.

Similar questions