Hindi, asked by Shravani6333, 3 days ago

मुलगा मुलगी एक समान या विषयावर निबंध लिया ​

Answers

Answered by Natashamore
7

Explanation:

जीवनाचं शिक्षण मिळायला सुरुवात होते ती घरापासूनच. शिक्षणाच्या संस्कारातून मुलाला हळूहळू जग कळायला लागतं. डोळ्यांनी दिसणारं जग, त्या संदर्भात कानावर पडणारं आई-वडिलांचं आणि इतरांचं भाष्य यांचे संस्कार त्या मुलावर कळत नकळत होत असतात; केले जातात.

समंजस आई-वडील, घरातले इतर सदस्य आणि संवेदनशील शेजारीपाजारी हे जाणीवपूर्वक करत असतात. मुलगा आणि मुलगी एकसमान असतात, त्यांच्यात आईवडिलांनी कसलाही भेदभाव करता कामा नये, असं करणं त्यांच्या आणि मुख्य म्हणजे त्यांच्या मुलांच्या आणि समाजाच्याही निकोप विकासाच्या दृष्टीनं योग्य नसतं, हा विचार गेली काही दशकं भारतातल्या समाजापुढे मांडला जात आहे.

सरकारी जाहिराती ठिकठिकाणी लागलेल्या असतात. रेडिओ, दूरचित्रवाणी, वर्तमानपत्रं अशा अनेक प्रकारच्या माध्यमांमधून जनतेला बदलण्यासाठी आवाहन करण्याचे प्रयत्न सातत्यानं चालू असतात. तरीही जोपर्यंत समाजातील आणि प्रत्यक्ष घरातील संस्कार बदलत नाहीत तोपर्यंत मुलांच्यात बदल होणार नाही. केर काढायचा झाला. धुणीभांडी करायची झाली तर भारतीय आई ते काम आपल्या मुलीलाच सांगते, मुलाला कधीही सांगत नाही. मुलासाठी फारशी कामंच नसतात. आयाच असा भेदभाव करतात, तेव्हा समानता कुठून येणार? मुलगा-मुलगी यांच्यात समानता आणायची असेल, तर आधी पालकांना बदलावं लागणार आहे.

Answered by jaa4953
2

Answer:

Explanation:

hi shrivani baby



Similar questions