मुलगा मुलगी समानता निबंध मराठी
Answers
Answered by
4
Answer:
जीवनाचं शिक्षण मिळायला सुरुवात होते ती घरापासूनच. शिक्षणाच्या संस्कारातून मुलाला हळूहळू जग कळायला लागतं. डोळ्यांनी दिसणारं जग, त्या संदर्भात कानावर पडणारं आई-वडिलांचं आणि इतरांचं भाष्य यांचे संस्कार त्या मुलावर कळत नकळत होत असतात; केले जातात.
समंजस आई-वडील, घरातले इतर सदस्य आणि संवेदनशील शेजारीपाजारी हे जाणीवपूर्वक करत असतात. मुलगा आणि मुलगी एकसमान असतात, त्यांच्यात आईवडिलांनी कसलाही भेदभाव करता कामा नये, असं करणं त्यांच्या आणि मुख्य म्हणजे त्यांच्या मुलांच्या आणि समाजाच्याही निकोप विकासाच्या दृष्टीनं योग्य नसतं, हा विचार गेली काही दशकं भारतातल्या समाजापुढे मांडला जात आहे.
Similar questions