माळवा हे शहर कोठे आहे
Answers
Answer:
मध्य भारतातील प्रसिद्ध सुपीक पठारी प्रदेश. राजकीय दृष्ट्या हा प्रदेश राजस्थान, मध्य प्रदेश व महाराष्ट्र या राज्यांत विभागला गेला आहे. प्राकृतिक दृष्ट्या माळवा हा सातपुडा पर्वताच्या मुख्य श्रेणीपासून उत्तरेस वाहणाऱ्या चंबळ नदी पाणलोटाचा पठारी प्रदेश म्हणता येईल. याच्या दक्षिणेस सातपुडा पर्वत असून पूर्वेस भोपाळ ते चंदेरीपर्यंतची याच पर्वताची पुराणात उल्लेखिलेली कुलाचल पर्वतरांग, पश्चिम भागात अमझर ते चितोड अशी विंध्याचलाचीच आणखी एक रांग व उत्तर भागात चितोड ते चंदेरी अशी मुंकुदबारी किंवा मुकुंदबारा डोंगररांग आहे. मात्र वेगवेगळ्या काळात माळवा प्रांतात कमीअधिक प्रदेश समाविष्ट होऊन त्याची व्याप्ती बदलत राहिली. मुसलमानी अमदानीत दक्षिणेकडे निमाड जिल्ह्याचा भाग, पश्चिमेकडे मेवाडचा काही प्रांत, उत्तरेकडे बुंदी व कोटा यांपैकी भाग व आग्नेयीकडे गढमंडलापर्यंतचा भाग माळव्यातच मोडत असे. प्राचीन काळी कुंतल म्हणजे हल्लीचा मंदसोरचा परिसर, बागर म्हणजे बांसवाड्याचा परिसर, रथ म्हणजे झाबुआ-जोबाट विलिनीकरणापूर्वीच्या संस्थानाचा मुलूख सोंडवाडा म्हणजे मेहिदपूरच्या आसपासच्या प्रदेश, उमातवाडा म्हणजे पूर्वीची राजगढ, नरसिंहगढ संस्थाने व खीचीवाडा म्हणजे पूर्वीचे राघोगढ संस्थान, हे माळव्याचे सहा भाग मानलेले दिसून येतात. भूरचनेनुसार माळव्याचे चार विभाग पडतात: माळव्याचे पठार, विंध्य पर्वत, नर्मदा नदीचे खोरे व सातपुडा पर्वत. कर्कवृत्त यांच्या जवळजवळ मध्यातून जाते. या नोंदीत फक्त माळव्याच्या पठारी भागाचे विवरण केले आहे.
Explanation:
please mark it as brainliest because it is a correct answer