History, asked by swatikadam8586, 1 month ago

माळवा हे शहर कुठे आहे?​

Answers

Answered by yatharthgo
1

Answer:

इन्दूर हे भारताच्या मध्य प्रदेश राज्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. इन्दूर हे मध्य प्रदेशाच्या भोपाळ ह्या राजधानीच्या शहरापासून २०० किमी पश्चिमेला आहे.हे शहर इंदौर जिल्ह्याचे मुख्य ठिकाण/मुख्यालय आहे. या शहराची लोकसंख्या मध्य प्रदेशात सर्वात जास्त आहे. या शहराला मध्यप्रदेशाची वाणिज्य राजधानी समजतात. मध्यप्रदेश राज्यातीलच नाही तर सम्पूर्ण देशातील बरेच लोक शिक्षणासाठी चांगला पर्याय म्हणून इदूरला येतात. इन्दूर हे शहर बरेच पुरातन आहे. पहिल्या बाजीरावांसोबत मराठी सरदार जेव्हा उत्तर दिग्विजय करत होते तेव्हा माळवा या प्रान्तातील इन्दूर या शहराची जहागिरी त्यांनी मल्हारराव होळकर यांना दिली. त्यानंतर उत्तरोत्तर या शहराचा विकास होत गेला. मल्हारराव यांचा मुलगा खण्डेराव हा युद्धात मारला गेल्यावर त्यांच्या सुनेने - अहिल्याबाई होळकर यांनी राज्यकारभार सांभाळला. त्या एक उत्तम राज्यकर्त्या म्हणून प्रसिद्ध झाल्या. अहिल्याबाईंचा महेश्वरचा राजवाडा अतिशय प्रेक्षणीय आहे. आजही सुस्थितीत असलेल्या मोजक्या राजवाड्यांत त्याची गणना होते.होळकरांचा राजवाडा इन्दूरच्या मध्यात उभा आहे. इन्दूर शहराचे हवामान अतिशय उष्ण व कोरडे आहे, आणि तापमान विषम आहे, म्हणजे हिवाळा अतिशय थंड असतो व उन्हाळा खूप गरम. इन्दूर एक औद्योगिक क्षेत्र आहे व भारतातील ३ मोठ्या स्टाॅक एक्सचेंजपैकी एक असलेले स्टाॅक एक्सचेंज येथे आहे. शहरात ५००० छोटे मोठे उद्योग आहेत. मध्यप्रदेशामधील सर्वात जास्त वित्त या शहरातून मिळते.

Hope it is helpful for you

please mark me as brainliest

Similar questions