मुलखतींची माध्यमे किती आहेत व कोणती आहेत
Answers
Answer:
मुलाखत देतांना आपला नैसर्गिक स्वभाव जसा आहे तसेच वर्तन केलेले योग्य असते. या मुळे मुलाखतही सहजतेने होते. म्हणूनच आपला नैसर्गिक स्वभाव न दाबता जे उमेदवार मुलाखतीस सामोरे जातात त्यांना निकालाची कधीच काळजी नसते. मुलाखतीत बहुदा स्वतःबद्दल बोलावे लागते. त्यासाठी उत्तम आत्मविश्वास असावा लागतो. आपण कोणकोणत्या विषयात आणि कौशल्यांमध्ये पारंगत आहोत हे व्यवस्थित जाणणे आवश्यक असते. त्यासाठी योग्य ते चिंतन आणि मनन करणे आवश्यक आहे. उमेदवाराला ज्या कामासाठी अर्ज केला आहे त्या क्षेत्रात आपण कसे योग्य आहोत हे पटवून देता आले पाहिजे. मुलाखतीत संभ्रमीत करणारे प्रश्न येऊ शकतात. कोणत्याही प्रश्नांचे उत्तरे किती शांतपणे आणि विचारपुर्वक देतो त्यावर उमेदवाराची हुशारी दिसून येते. उमेदवाराचा स्वभाव आणि एकंदरीत वागण्याची पद्धत यांचे निरिक्षण मुलाखत घेणारा करत असतो. उमेदवाराची कठीण परिक्षा घेण्यापेक्षा रिक्त जागेकरिता सर्वात चांगला उमेदवार निवडण्याची जबाबदारी मुलाखतकर्त्यावर असते. म्हणून त्या जागेकरिता 'मीच कसा योग्य आणि उपयुक्त आहे' हे कळत नकळतपणे मुलाखत देणाऱ्याने दखाऊन द्यायचे असते.