मामुच्या व्यक्तीमत्वाचे विविध पैलू
तुमच्या शब्दात लिहा
Answers
Explanation:
राहणीमान,रुप हे मामुचया महत्त्वाचे विविध पैलू आहेत
मामू हा कष्टमय जीवन जगणारा एक सामान्य माणूस होता, मात्र त्याचे मन संवेदनशील होते. एकदा राजाराम महाराजांचा मुक्काम पन्हाळगडावर होता. मामूला पन्हाळ्यावर हजेरी लावावी लागली. त्या काळात सामान्य माणसाला वाहतुकीची कोणतीच साधने उपलब्ध नव्हती. पन्हाळ्यावर जायचे म्हणजे दगडधोंड्यांतून, काट्याकुट्यांतून, जंगलातून वाट काढत जायचे होते. बरे, महाराजांच्या सेवेसाठी जायचे असल्यामुळे रमत-गमत जाणे शक्यच नव्हते. अशा या खडतर वाटेने चौदा मैलांची पायपीट केल्यावर त्याचे शरीर दमले होते. पण त्याची याबद्दल जराही तक्रार नव्हती. त्याचे मन मात्र ताजे, टवटवीत होते. तो निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेत घेत तिथे पोहोचला होता. आताही इतक्या वर्षांनंतर त्या प्रसंगाची आठवण काढताना त्याच्या तोंडून उद्गार येतात, "फाटेचं धुक्यातलं पन्हाळ्यावर चढणं लई गमतीचे." मामाची ही संवेदनशीलता होय.
दुसरा प्रसंग म्हणजे मामूच्या मुलाच्या लग्नाचा प्रसंग. मामच्या चतुरस व्यक्तिमत्त्वामुळे आणि त्याच्या प्रेमळ स्वभावामुळे त्याचे अनेकांशी आपुलकीचे नातेनिर्माण झाले होते. म्हणून या लग्नाला समाजातील अनेक मोठमोठी माणसे आली होती. आमदार, खासदार, बडे व्यापारी, शिक्षक-प्राध्यापक असे वेगवेगळ्या थरांतले लोक आत्मीयतेने जमले होते. ते पाहन त्याचे मन भरून आले. आपल्यासारख्या सामान्य, गरीब माणसाविषयी लोकांना खूप आत्मीयता आहे, हे पाहून त्याचा कंठ दाटून आला. सर्वांचे आभार मानताना त्याच्या कंठातून शब्दच फुटेनात. कसेबसे आभार मानून त्याने माईक खाली ठेवला. या दोन्ही प्रसंगांतून मामूच्या संवेदनशील मनाचे दर्शन घडते.
hope it was helpful
mark me as brainlist