India Languages, asked by kadampoonamoct10, 9 months ago

'मी माझ्या देशाचा नागरिक' या विषयावर पुढील मुद्दे विचारात घेऊन लेखन करा:-

जबाबदार नागरिक - हक्क व कर्तव्ये यांची जाणीव- देशाच्या सद्य स्थितीचे ज्ञान - स्वत:चे वागणे - देशप्रेम व राष्ट्रीयत्व याची जाणीव.

Please write for eight marks
please please please answer it fast

no spam other wise will be reported​

Answers

Answered by Anonymous
170

Answer:

ʜᴏʟᴀ ᴍᴀᴛᴇ ✌

♡*:.。.ᴀɴsᴡᴇʀ.。.:*♡

::::::::::::::::::::☆::::::::::::::::::::

❣मी माझ्या देशाचा नागरिक❣

☞सामाजिक जीवनात अनेक ठिकाणी आपण आपल्या काही सामाजिक जबाबदा-या पार पाडतो का? आपल्या आजूबाजूला आपण ब-याच वेळा चिमुकल्यांना विविध ठिकाणी राबताना पाहतो. काम करण्याचे वय नसताना अनेक धोकादायक आणि कठीण कामे त्यांना करताना पाहतो. आपल्यापैकी किती जण या विरोधात आवाज उठवतात? एकीकडे लहान मुले म्हणजे ‘देशाचे आधारस्तंभ’ म्हणायचे आणि दुसरीकडे याच ‘आधारस्तंभांना’ राबताना पाहून गप्प बसायचे, हे कितपत योग्य वाटते? आपण ‘जबाबदार नागरिक’ असाल तर आपल्या आजूबाजूला असलेल्या एनजीओंना, सामाजिक कार्यकर्त्यांना किंवा पोलीस ठाण्यात याबाबत माहिती नक्कीच दिली पाहिजे..

विरोधाभास किती आणि कसा असतो याचे अगदी ताजे उदाहरण या आठवडयात पाहायला मिळाले. मुंबईजवळ असलेल्या ठाण्यातील एका हॉटेलात चहा पिण्याकरिता गेलो होतो. दुकानात ‘येथे बाल कामगार राबत नाहीत’ असो फलक लावला होता.

☞चहा पिता पिता एका वर्तमानपत्रात ‘ठाणे पोलिसांचे ऑपरेशन ‘मुस्कान’ सुरू, कारखान्यातून चार बालकामगारांची सुटका’ अशी बातमी वाचावयास मिळाली. म्हणजे एकीकडे काही लोक ‘आम्ही बालकामगार ठेवत नाही, असे फलक लावून सांगतात’ आणि दुसरीकडे कायद्याने गुन्हा ठरत असतानाही अनेक धोकादायक जागी लहान मुलांना राबवून घेतले जाते. असे का? ही परिस्थिती आपण बदलणार आहोत की नाही? आपण समाजातील एक जबाबदार नागरिक आहोत.

अनेक ठिकाणी बालकामगारांना काम करताना पाहून ‘त्यांना पैशांची गरज आहे म्हणून ते अशी कामे स्वत:हून करतात,’ असे अनेक जण बोलताना दिसतात. ‘गरज आहे’ याचा अर्थ असा नाही की तुम्ही चिमुकल्यांकडून काहीही कामे करून घ्याल.

आज अनेक उच्चभ्रू वस्त्यांमध्ये १४ वर्षाखालील मुलींकडून घरकाम करून घेतले जाते. त्यासाठी त्यांना घरीच आसराही दिला जातो. झोपण्यासाठी स्वयंपाकघराचा एखादा कोपरा त्या मुलींना दिला जातो. गरीब कुटुंबातील काही लहान मुलांना आपल्या घरी कामाला ठेवून त्या बदल्यात त्यांच्या आई-वडिलांना काही रक्कम दिली जाते. हे कितपत योग्य आहे? अशा लोकांवर कितपत कारवाई होते?

☞मुळात चौदा वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना दुकानात किंवा इतर ठिकाणी कामाला ठेवणे किंवा त्यांच्याकडून काम करून घेणे हा कायद्याने गंभीर गुन्हा आहे. पण तरीही अनेक लहान बालकांना राबवून काही जण त्या चिमुकल्यांच्या भवितव्यात खोडा आणण्याचा प्रयत्न करत असतात व त्यांचे भविष्य अंधारमय करत असतात. शिक्षण घेण्याच्या वयात त्या मुलांकडून कामे करून घेतली जातात.

☞शहरातील अनेक लहान-मोठया हॉटेल्समध्ये, चहा टप-यांवर बालमजुरी करणारी चिमुकली मुले सर्रास पाहायला मिळतात. ब-याच ठिकाणी कापडाची दुकाने, किराणा माल दुकान, वीटभट्टया, सायकल दुरुस्ती दुकाने किंवा काही ठिकाणी लहान इंडस्ट्रीयल कंपन्यांमध्येही लहान मुलांकडून काम करून घेतले जाते. काही राजकारणी तर याच्याही चार पावले पुढे गेले आहेत. आता अनेक ठिकाणी राजकीय पक्षांचे कार्यकर्ते मुलांना खाऊ देण्याच्या किंवा पैसे देण्याच्या नावाखाली लहान मुलांचा प्रचार करण्यासाठी उपयोग करतात.

☞मे २०१५ मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळात झालेल्या बैठकीत बाल कामगार (प्रतिबंध व नियमन) सुधारणा विधेयक २०१२मध्ये सुधारणा करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे बाल कामगार (प्रतिबंध व नियमन) सुधारणा विधेयक १९८६च्या कायद्यात बरेच बदल होतील, निदान अशी आशा तरी निर्माण झाली आहे.

☞जून २०१५ मध्ये बालकामगारांबाबत झालेल्या एका सर्वेमध्ये ‘देशभरात पाच कोटी बालकामगार’ काम करत असल्याचे उघडकीस आले. बालमजुरी थांबवण्यासाठी शासन विविध स्तरावर अनेक प्रयत्न करीत आहे. पण तरीही यात पाहिजे तेवढे यश आलेले दिसत नाही. अनेक ठिकाणी यंत्रणेतील उदासीन अधिका-यांमुळे किंवा कर्मचा-यांमुळे अनेक चिमुकली मुले बाजमजुरी करताना दिसतात.

☞मुळात या अशा प्रकारच्या घटनांना समाजातील काही घाबरट व्यक्तीही तितक्याच जबाबदार असतात. अशा व्यक्ती स्वत: काही करत नाहीत आणि दुसरा एखादा कोणी एखाद्या बेकायदेशीर गोष्टींच्या विरोधात लढत असेल, तर त्याला कुठल्याही प्रकारे मदतही करत नाहीत. या अशाच लोकांमुळे समाजात बेकायदेशीर कृत्य करणा-यांचे फावते आणि त्यामुळेच अशा प्रकारची बेकायदेशीर कामे ते लोक बिनधास्तपणे करतात.

काही टोळया लहान मुलांचे अपहरण करून त्यांना दुस-या राज्यात नेऊन विकतात व तेथे काम करण्यास भाग पाडतात. तेव्हा आपण नुसते जागेच राहण्याची नाही तर सावध होण्याचीही गरज आहे. एक ‘जबाबदार नागरिक ’ म्हणून आजूबाजूला दिसणा-या अशा काही चुकीच्या गोष्टींची माहिती संबंधित पोलीस ठाण्यात अगदी निर्धास्तपणे दिली पाहिजे किंवा तसे करण्यास भीती वाटत असेल तर अनेक पत्रकार, एजनीओ आपले नाव गुप्त ठेवून त्या विरोधात त्यांच्या परीने लढा देतात. आवश्यकता आहे ती आपण एक ‘जबाबदार नागरिक’ म्हणून पुढे येण्याची.

:::::::::::::::::::::::☆:::::::::::::::::::

ᴍʏ ᴘʟᴇᴀsᴜʀᴇ ᴛᴏ ʜᴇʟᴘ ᴜʜʜ

ᴍᴀʀᴋ ᴀs ʙʀᴀɪɴʟɪᴇsᴛ

ᴛʜᴀɴᴋ ᴍʏ ᴀɴsᴡᴇʀ

ᴡɪᴛʜ ʀᴇɢᴀʀᴅs

❤ᴀʀ+ɴᴀᴠ❤

Answered by sanket2612
35

Answer:

मी माझ्या देशाचा नागरिक

चांगल्या नागरिकाला अनेक गुण आत्मसात करावे लागतात. त्याच्यावर काही कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या आहेत, हे वास्तव आहे. परंतु त्याच वेळी, त्याला मुक्त राज्याचे नागरिक म्हणून काही अधिकार आणि विशेषाधिकार देखील मिळतात. त्याला देशाच्या न्यायिक, कायदेशीर, राजकीय, धार्मिक आणि सामाजिक व्यवहारात भाग घेण्याचा अधिकार असला तरी त्याच्या काही जबाबदाऱ्याही आहेत, त्याने इतरांच्या भावना दुखावू नयेत आणि दुर्बलांचे बलवानांपासून संरक्षण केले पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत राष्ट्र आणि समाजाशी एकनिष्ठ राहणे हे त्याचे आद्य आणि प्रमुख कर्तव्य आहे.

चांगल्या नागरिकाने आपल्या मातृभूमीसाठी प्राणाची आहुती देण्यास तयार असले पाहिजे. त्याने आपल्या राष्ट्रावर प्रेम केले पाहिजे आणि राष्ट्रवादी असणे आवश्यक आहे. त्याचा मातृभूमीवर दृढ आणि गाढ विश्वास असावा. त्याने देशाचे कायदे पाळले पाहिजेत. त्याने राज्याचे कल्याण, समाजाचे हित आणि राष्ट्राचे दीर्घकालीन हितही लक्षात ठेवले पाहिजे.

#SPJ2

Similar questions