Hindi, asked by omkar2395, 1 year ago

मी मुख्यमंत्री झालो तर,,,,,,​

Answers

Answered by atharv4345
4

Answer:

मी मुख्यमंत्री झालो तर.. खरं तर हा मुद्दाच नाही कारण मीच मुख्यमंत्री होणार आहे. मी निवडणूक हरलो तरी मागच्या दरवाजांनी आत येणार हे नक्कीच. कोणी अडचण आणली तर माझ्या पक्षाचे अध्यक्ष माझ्या पाठीशी आहेत. मला तितका आत्मविश्वास आहे. कारण तेवढे गुण माझ्यात आहेत. एक तर मी कर्तबगार आहे. माझ्या जातीमध्ये माझा किती दबदबा आहे हे सर्वश्रुत आहे. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना अडचणीत आणणारे वक्तव्य मी करीत नाही. मला हांजी हांजी करायला खूप आवडते. अमूलचे बटर नेहमीच माझ्या खिशात असते वगैरे वगैरे.

मी मुख्यमंत्री झाल्यावर काही लोक माझा सत्कार करण्याची शक्यता आहे. मला हे खरोखरच आवडत नाही. पण माझं कोण ऐकतं? मी लोकांच्या मनाला यातना देऊ शकत नाही. मी फारच भावनाशील आहे. त्यामुळे गुलाबाचे फूल किंवा फुलाची पाकळी कोणी दिल्यास मी घेत जाईन.

माझ्या पाठीशी डावे, उजवे उभे आहेत. मी मात्र खुर्चीवर बसलो आहे. प्रथम मी त्यांचे भले करणार कारण त्यांच्या पाठिंब्यामुळे तर या खुर्चीवर आहे. बांधव-बांधीलकी याला प्रथम स्थान. नंतर वेळ मिळाल्यास लोकांचे प्रश्न सोडवीन. नाही तरी आश्वासने दिलीच आहेत. त्यामुळे त्यांचे मानसिक संतुलन बिघडणार नाही. आर्थिक अडचण हे कारण सांगून त्यांचा मोर्चा परत पाठविता येईल. थोडा मलिदा त्यांच्या नेत्यांना दिला म्हणजे संपले.

हे सर्व करण्याकरिता कायद्याची आवश्यकता असते. म्हणून नवीन नवीन कायदे करीन. त्यामुळे लोकांना कृतकृत करीन. म्हणजे त्यांना आत्महत्या करावी लागणार नाही.

या भुक्कड देशात काय आहे, म्हणून लोक इराक, दुबई, पोलंड व इतर फॉरेन देशांत पैसे कमवायला जातात. त्यांना तिथे काही अडचणी आल्या की माझ्यासारख्या भावनाशील मुख्यमंत्र्यांकडे त्यांची मुलंबाळं येतात आणि आक्रोश करतात, रडतात, लोटांगण घालतात. काहीही करा, लागल्यास मागतील ते त्यांना देऊन टाका, पण माझ्या लेकराला वाचवा, असं म्हणतात. जसे काही ते मला विचारूनच फॉरेनला गेले होते. मलासुद्धा त्यांचं दु:ख पाहावत नाही. मी आणतो त्यांना सोडवून. आतापर्यंत एका मंत्र्याची मुलगी, कंदहार विमान अपहरण प्रकरण, आता इराकचे तीन ट्रक ड्रायव्हर व लेटेस्ट पोलंडचे प्रकरण वगैरे वगैरे.. तुम्हाला सगळं माहीतच आहे. त्यामुळे हे पाल्हाळ आता बंद करतो

Answered by ItsShree44
0

Answer:

निवडणुकांचे दिवस जसेजसे जवळ येऊ लागले. तसतसा सभांना, मिरवणुकींना येऊ लागला. प्रत्येक वक्ता इतक्या आवेशाने बोलत असे की, वाटे याला देशाची, राज्याची केवढी काळजी आहे । वक्ते आपल्या भाषणांतून श्रोत्यांसमोर एक नवे नंदनवनच उभे करत होते. 'आम्हांला निवडून दया. मग आम्ही तुमच्यासाठी हे करू, ते करू' अशा आश्वासनांची खैरात ते लोकांवर करत होते. मनात आले की, खरंच काय मिळणार आहे या लोकांना ? आपण लढवावी का निवडणूक ? मी विचार करू लागलो. या लबाड लोकांपासून देश वाचवण्यासाठी आपणही या निवडणुकीच्या मैदानात उतरले पाहिजे.

समजा, मी निवडणुकीत विजयी होऊन मुख्यमंत्री झालो तर...? तर पहिली गोष्ट मी भाषणांवर बंदी आणीन, प्रत्यक्ष कार्याला महत्त्व देईन. माझ्या सर्व सहकारी मंत्र्यांना विश्वासात घेऊन मी त्यांना समजावून देईन की, तुम्ही तुमच्या कार्याला महत्त्व दया. तुमचे विधायक कार्य हेच तुमच्या प्रचाराचे साधन होऊ दया. पुढच्या निवडणुकीच्या लोकांनी आपण होऊन तुम्हाला निवडून दिले पाहिजे, किंबहुना तुमच्यासाठी त्यांनी मागणी केली पाहिजे, अशीच तुमची कामगिरी असली पाहिजे.

मी मुख्यमंत्री झालो, तर पहिली गोष्ट मी लक्षात ठेवीन की, मी जनतेचा सेवक आहे. राज्य माझे नाही, हे राज्य जनतेचे आहे. प्रत्येक क्षणी मी जनतेचाच विचार करीन. या राज्याला भ्रष्टाचाराच्या महारोगाने ग्रासले आहे. हा रोग मला बरा करायचा आहे, मुळापासून उपटून टाकायचा आहे. त्यासाठी मी माझ्यापासूनच सुरुवात करीन. भ्रष्टाचार करणाऱ्याला जनतेच्या दरबारात उभे केले जाईल व मग जनताच त्याला कडक शासन करील. जनता ही अनेक वेळा मुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचू शकत नाही. त्यामुळे लोकांची दुखणी मुख्यमंत्र्यांना समजतच नाहीत. मी मुख्यमंत्री झालो, तर मी माझ्याबरोबरचा लवाजमा काढून टाकीन. मी स्वत: जनतेत जाईन. मी जनतेचा प्रतिनिधी असेन. मग मला जनतेपासून भीती का वाटावी? मी माझ्याभोवती संरक्षणाचे कडे ठेवणार नाही. मी लोकांच्यात मिसळेन. त्यांच्या. आनंदात भाग घेईन, त्यांच्या दुःखाचा भार उचलेन. मला नेहमी वाटते की, आपल्या या राज्यात पैशाची उधळपट्टी फार होते, त्याचबरोबर वेळेचाही फार अनाठायी व्यय होतो. सभा, समारंभ, हारतुरे यांवर नाहक खर्च होतो. कथांतून वेषांतर करून जनतेत जाणाऱ्या राजांच्या अनेक गोष्टी लहानपणी मी ऐकल्या होत्या. मीही माझ्या रयतेशी असा प्रत्यक्ष संबंध ठेवला, तर मग इतर सरकारी सेवक जनतेची वा माझी फसवणूक करू शकणार नाहीत, आळसही करणार नाहीत. जनतेचे प्रश्न पटापट सुटतील. प्रजेच्या मनात आपल्या राज्यकर्त्याबद्दल विश्वास निर्माण झाला की, प्रजाही मदत करू लागेल. एवढं प्रचंड मनुष्यबळ मिळाले, तर विधायक कार्ये सहजतेने पार पडतील व एक सुराज्य निर्माण होईल. पण हे केव्हा? जर मी मुख्यमंत्री झालो तर...

Similar questions