मे महिन्याच्या सुट्टीत तुम्ही गावाला जाऊन काय धमाल केली, हे तुमच्या मित्राला / मैत्रिणी
Answers
■■ दिलेले प्रश्न अपूर्ण आहे, पूर्ण प्रश आहे मे महिन्याच्या सुट्टीत तुम्ही गावाला जाऊन काय धमाल केली, हे सांगण्यासाठी तुमच्या मित्राला पत्र लिहा:■■
२०१, शिवस्मृती,
बाजारपेठ,
पुणे.
दि : २६ मार्च, २०२०
प्रिय नरेश,
सप्रेम नमस्कार.
कसा आहेस तू? मी इथे ठीक आहे. मी कालच गावावरून आलो. यावेळी गावी मी खूप मजा केली.
दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा मी मे महिन्याच्या सुट्टीत माझ्या गावी कोल्हापुरला गेलो होतो. तिथे मी खूप मजा केली.
आम्ही सगळे भावंड आमच्या गावातल्या घरासमोर अंगणात खूप खेळायचो. तिथे असलेल्या झाडांंवर चढायचो.झाडावरून आंबे व काजू तोडून खायचो.
आमच्या गावात एक नदी आहे. तिथे आम्ही रोज पोहायला जायचो. तिथे बाजूलाच एका डोंगरावर देवीचे देऊळ आहे. आम्ही सगळे तिथे देवीच्या दर्शनासाठी गेलो होतो.
मी पुढच्या वर्षी सुद्धा माझ्या गावी जाणार आहे. माझी अशी इच्छा आहे की तू पण माझ्यासोबत यावे. आपण खूप मजा करूया.
आपण लवकरच भेटू. तुझ्या आई बाबांना माझा नमस्कार सांग.
तुझा मित्र,
संकेत.