५) मान्सून म्हणजे काय?
मानसून मनजे काय
Answers
Answer:
मान्सून म्हणजे नक्की काय? आणि त्याचे काही ऐतिहासिक संदर्भ देता येतील का?
* मान्सून म्हणजे ठरावीक काळाने दिशा बदलणारे वारे. मान्सूनच्या शास्त्रोक्त व्याख्येत पर्जन्याला स्थान नाही. मान्सून हा मुळात अरेबिक शब्द असून त्याचा संदर्भ ऋतू या शब्दाशी जोडला जातो. शेकडो वर्षांपूर्वीपासून अरबी समुद्रावर होणाऱ्या वाऱ्यांच्या बदलांना मासेमारी करणाऱ्या लोकांनी ही संकल्पना वापरल्याचे सांगण्यात येते. दिशा बदलणारे हे वारे सहा महिने नैर्ऋत्येकडून तर बाकी सहा महिने ईशान्येकडून वाहतात.
* या मौसमी वाऱ्यांची निर्मिती कशी होते? त्यामागे काही ठरावीक विज्ञान आहे का?
* जमीन लवकर तापते आणि लवकर थंड होते. याउलट पाण्याला तापण्यासाठी तसेच थंड होण्यासाठीही जास्त वेळ लागतो. जमीन आणि पाणी या दोन्हीतल्या तापमानातील या फरकामुळे वाऱ्यांची निर्मिती होते. सूर्याभोवती पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे समुद्र आणि जमिनीवर कमी किंवा जास्त दाबाचे पट्टे निर्माण होतात, आणि मग वाऱ्याच्या नियमाप्रमाणे हे वारे जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहू लागतात. उन्हाळ्यात आशिया खंड खूप तापतो आणि हिंदी महासागराचे तापमान त्या मानाने कमी असते तेव्हा वारे समुद्राकडून जमिनीकडे वाहतात. उलट हिवाळ्यात आशिया खंड थंड होतो आणि हिंदी महासागर तितका थंड झालेला नसतो तेव्हा वारे जमिनीकडून समुद्राकडे वाहतात. उन्हाळ्यात वाहणारे वारे हे समुद्रावरून जमिनीकडे येत असल्याने ते बाष्पयुक्त असतात, त्यामुळे अशा बाष्पयुक्त वाऱ्यामुळे भारतीय उपखंडाला पाऊस मिळतो. मान्सून काळात समुद्रसपाटीपासून पाच किलोमीटपर्यंत नैर्ऋत्येकडून, तर पाच ते बारा किलोमीटपर्यंत पूर्वेकडून वेगवान वाऱ्यांचा प्रवाह सक्रिय असतो. यांपैकी पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणाऱ्या वरच्या थरांतील वाऱ्यामुळे कमी दाबाची क्षेत्रे समुद्राकडून जमिनीकडे ढकलली जातात. त्यामुळे मान्सून सक्रिय राहतो. याउलट हिवाळ्यात वाहणारे वारे हे जमिनीकडून वाहत असल्याने त्यांच्याकडून पाऊस मिळण्याची शक्यता कमी असते.
तापमानातील फरक, कमी-जास्त दाबाची क्षेत्रे, वारे, त्याच्या दिशा आणि सूर्य, या निसर्गाच्या सगळ्या घटकांमध्ये माणसाला अचंबित करील अशी सूत्रबद्धता असते. त्यामुळे प्रमाण कितीही कमी किंवा जास्त असले तरी दरवर्षी मान्सूनचा पाऊस येणार हे मात्र निश्चित असते.
* भारताप्रमाणेच इतर देशांमध्येही मान्सून असतो का?
* शीत कटिबंधात मान्सून उद्भवू शकत नाही. तो फक्त उष्ण कटिबंधातच आढळतो. त्यामुळे शीत कटिबंधातील देशांमध्ये वर्षभर पाऊस पडतो आणि त्याचे प्रमाणही कमी- अधिक असते. जागतिक पातळीवर निर्माण होणारी दाब क्षेत्रे, तापमानातील बदल अशा अनेक घटकांचा मान्सूनशी संबंध असतो. यामुळे आफ्रिकेतला काही भाग, ऑस्ट्रेलिया, मध्य अमेरिका, इंडोनेशिया अशा जगातल्या विविध भागांत मान्सूनची वेगवेगळी रूपे पाहायला मिळतात. परंतु भारतासारखी पावसाची नियमितता मात्र इतर कुठेही दिसत नाही. सलग चार महिने नित्यनेमाने येणारा पाऊस आणि त्यानंतर परतीचा मान्सून हे साचेबद्ध रूप फक्त भारतातच अनुभवता येते.
Answer:
नेमेचि येतो पावसाळा हे आपणास ठाऊकच आहे म्हणूनच त्याला मोसमी पाऊस /पावसाळा असेही म्हणतात. पण तो नक्की कधी येणार, कसा , किती प्रमाणात येणार या आणि तत्सम भाकितांवर भारतासारख्या विशाल , खंडप्राय देश्याच्या आर्थिक , सामाजिक , राजकीय आणि एकूणच जागतिक लोकसंख्येत अंदाजे १८-२०% इतक्या मोठ्या प्रमाणात असलेल्या जनतेच्या किमान वर्षभराच्या जीवनमानाची गणिते -ठोकताळे अवलंबून असतात . नाही म्हणायला आताश्या बाळसे धरू लागलेला नव-श्रीमंत विविध उद्योजक, नोकरदार , व्यावसायिक आणि बऱ्याच मोठ्या प्रमाणात असलेले राजकीय उद्योजक अश्या सर्वांचा अपवाद तेवढा गृहीत धरावा लागेल कारण पाऊस वगैरे सारख्या घटकांचा त्यांच्या अर्थार्जानावर फारसा काही विपरीत परिणाम संभवत नाही (झाला तर फायदाच होतो कारण दुष्काळ म्हणजे वेगवेगळ्या योजनांची खैरातच की हो म्हणूनच दुष्काळ आवडे सर्वांना असे ख्यात आहेच या वर्गाबद्दल). असो तर असा हा मोसमी पाऊस "मान्सून" नामक विशिष्ट पद्धतीने वाहणाऱ्या वाऱ्यांच्या प्रवाहावर अवलंबून असतो हे आपणास ढोबळमानाने ठाऊक आहे. पण मान्सून म्हणजे काय रे भाऊ ? हा प्रश्न आपणा बहुतेकांना कधीना कधी हमखास पडतोच. अलीकडेच या संबंधी मान्सूनच्या विविध पैलूंसंदर्भात भारतीय उष्ण देशीय मौसम विज्ञान संस्थेचे नवनिर्वाचित संचालक डॉ. माधवन नायर राजीवन यांच्याशी स्नेहा कुलकर्णी यांनी केलेली बातचीत वजा माहितीपूर्ण आणि प्रदीर्घ लेख माझ्या वाचनात आला तोच माहितीस्तव देत आहे.
Explanation:
like and follow me pls