India Languages, asked by sonalika2230, 7 months ago

माणुसकीचे अभंग नाते आम्हीच अमुचे भाग्यविधाते या काव्यपंक्तीतुन कवीने सूचित केलेला विचार तुमच्या शब्दांत मांडा please answer my question it's to urgent

Attachments:

Answers

Answered by sudarshansable04
0

Answer:

'आभाळाची अम्ही लेकरे' या कवितेतील प्रस्तुत काव्यपंक्तींद्वारे कवी वसंत बापट यांना कष्टकऱ्यांमधील माणुसकीचे नाते अधोरेखित करायचे आहे. आपापसांतील माणुसकीचे नाते अखंड टिकून असल्यामुळे कष्टकरी वर्गात कोणत्याच प्रकारचा भेदभाव नाही. 'श्रम' करणे हेच त्यांचे इमान आहे. कष्टावरच त्यांची निष्ठा आहे. कष्ट हीच त्यांची ओळख, कष्ट हाच धर्म आहे. कष्ट करून आपले पोट भरणे हाच त्यांचा मार्ग आहे. कष्टातून मिळणारा आनंद हेच त्यांच्यासाठी स्वर्गसुख आहे. त्यामुळे, कष्टाशिवाय त्यांना वेगळा असा दुसरा धर्म, पंथ, जात, मार्ग नाही. या कष्टांच्या बळावरच ते स्वत:चे भाग्य लिहू शकतात, असा दुर्दम्य आत्मविश्वास कवी प्रस्तुत ओळींतून व्यक्त करत आहे.

Similar questions