माणूसपणाचं पोषण होण्यासाठी हवाय.( संवाद, विसंवाद, अहंकार )
Answers
Answer:
I guess
2nd option
Explanation:
Hope it helps you
Answer:
सध्याच्या दैनंदिन जीवनात आपला आयुष्य फरपटत चाललेले आहे. सगळे आयुष्य जगण्यासाठी धावत आहेत. कुणालाच कुणासाठी वेळ नाही. सगळे आपल्या जीवनात रममाण झालेले आहे.
माणसातला संवाद हरवला आहे. म्हणून माणूसपणाचं पोषण होण्यासाठी संवाद गरजेचा आहे. संवाद होत नसल्यामुळे दिवसेंदिवस नाती एकमेकांपासून दुरावत आहेत. जिव्हाळा, आपुलकी, प्रेम या गोष्टी नात्यांमध्ये कमी होताना दिसत आहे. संवाद अशी गोष्ट आहे ज्यामधून एकमेकांच्या मनातील गोष्टी विचार बाहेर येतात.
संवादाच्या माध्यमातून आपण एकमेकांचे दुःख समजू शकतो. ते दूर करू शकतो. आई वडील यांचा मुलांशी संवाद हरवलेला आहे. आपल्या म्हाताऱ्या आई बाबांशी सुद्धा मुलांना बोलायला वेळ नाही. त्यामुळे आता कुठेतरी थांबायला हवे. आठवड्यातून एक दिवस तरी आपल्या लोकांची संवाद साधा. हे गरजेचे आहे संवाद साधल्यामुळे आयुष्य सुंदर बनते.