India Languages, asked by chavanchinmay92, 3 months ago

माणसाच्या जडणघडणीत असलेल्या पुस्तकाची भूमिका तुमच्या शब्दात व्यक्त करा.​

Answers

Answered by yashrajchoudhar23
3

Answer:

मानवी जीवनामध्ये पुस्तकाला खूप महत्त्वाचे स्थान आहे. वाचकाला पुस्तकातून चांगले काय, वाईट काय याचे दर्शन घडते. तो चांगले-वाईट ओळखायला शिकतो. वाईटाचा त्याग केला पाहिजे आणि चांगले आत्मसात केले पाहिजे ही दृष्टी त्याला मिळते. त्यानुसार जीवन जगायला तो सुरुवात करतो. यावरून माणसाच्या आयुष्यातील पुस्तकाचे महत्त्व आपल्या सहज लक्षात येईल... उदाहरणार्थ, महात्मा फुले यांचे साहित्य आपण वाचले की शेतकऱ्यांची हलाखीची स्थिती, होणारा अन्याय आपल्या लक्षात येऊ लागतो. त्यामुळे आपल्या अंत:करणात भावनांची मोठी खळबळ उडते. आपल्या अवतीभवतीच्या परिस्थितीचे आपण निरीक्षण करतो. त्यात चांगले काय आहे, वाईट काय आहे, हे आपल्याला कळू लागते असे पस्तक आपण कधी View in app X विसरू शकत नाही. उलट, जस पुस्तक आपण पुन्हा पुन्हा वाचत राहतो.

प्रत्येक वाचनाच्या वेळी आपल्याला नवीन दृष्टी मिळते.

Similar questions