India Languages, asked by varunbhoir109, 8 months ago

माणसाच्या दयाबुद्धीला, करुणेला मुके प्राणी कसे आवाहन करतात,' ते तुमचा अनुभव तुमच्या शब्दांत लिहा​

And its marathi language ​

Answers

Answered by rajraaz85
20

Answer:

आमच्या घरी कोणताच पाळीव प्राणी पाळलेला नाही परंतु पाळीव प्राण्यां बद्दल नुकताच एक अनुभव मला आला. आमच्या घरी जेवत असताना रोज एक कुत्रा आमच्या दरवाजा समोर उभा राहायचा. आम्ही रोज त्याला भाकरी किंवा चपाती टाकत असतो. आता हे रोजचेच झाले आहे.

मागच्या आठवड्यात आम्ही ज्या कुत्र्याला भाकर टाकतो तो अचानक जोरात आमचे दारावरून भुंकू लागला. आम्हाला वाटले की तो असंच दुसऱ्या कुत्र्यांना पाहून बघत असेल परंतु त्याच्या भुंकण्याचा आवाज वाढत होता.

जेव्हा मी व माझे वडील उठून बाहेर पाहू लागलो तेव्हा आम्हाला जाणवले की कोणीतरी आमच्या घराच्या छतावर लपले होते. आमच्या लगेच लक्षात आले की ते चोर होते. आमची हालचाल व कुत्र्याचे भुंकणे पाहून चोर लगेच पळून गेले. त्या दिवसापासून आम्ही त्या कुत्र्याला आमच्याकडेच पाळायचे ठरवले.

आमची कुत्र्याला भाकर टाकण्याच्या एका सवयीमुळे आमच्या घरात चोरी होण्यापासून वाचली. नंतर आम्ही त्याचे नाव बंडू ठेवले. बंडू आता नेहमी आमच्या सोबत राहतो.

म्हणून माणसाच्या दया बुद्धीला किंवा प्रेमाला मुके प्राणीही त्यांच्या पद्धतीने प्रतिसाद देतात हे खरे आहे, असा आम्हाला अनुभव आला.

Similar questions