India Languages, asked by varshamahendar1, 10 months ago

माणसाला भविष्याबद्दल फक्त कुतूहल नसते तर भीतीही असते; केवळ
निश्चितता नसते तर असुरक्षितताही असते. ज्योतिष शास्त्रा'चा जन्म भविष्याचा
वेध घेण्याच्या धडपडीतून झाला; परंतु ज्या अर्थाने पदार्थ विज्ञान किंवा रसायनशास्त्र
ही 'शास्त्रे' आहेत ; त्या अर्थाने ज्योतिष हे 'शास्त्र' नव्हे. विज्ञानात गृहीतक, साध्य,
सिद्धता, पुरावा, सार्वत्रिकता, चाचणी, पुनःप्रत्यय, आव्हान, शंका आणि सिद्धांत
अशा अनेक पायऱ्या व टप्पे असतात. ज्योतिष शास्त्र' या निकषावर उभे राहत
नाही आणि म्हणून त्याला वैज्ञानिक स्थान देणे अशास्त्रीय' आहे. असंख्य लोकांनी
ज्योतिषावर श्रद्धा आहे म्हणून त्याला वैज्ञानिक दर्जा देता येणार नाही; परंतु सर्व
ज्योतिषी हे थोतांड वा केवळ बनवाबनवी करणारे असतात, असे नव्हे. काहींची
ग्रह-ताऱ्यांच्या हालचालींवर श्रद्धा आणि नजर असते. त्यानुसार मांडणी करण्याचा
त्यांचा इतका प्रामाणिक प्रयत्न असतो, की काही वैज्ञानिक मंडळीही ज्योतिषावर
विश्वास ठेवतात; परंतु प्रश्न केवळ थोतांड वा शास्त्र यापुरताच मर्यादित नाही.
ग्रह-ताऱ्यांचा संदर्भ न घेता, कुंडली न मांडता, हातावरच्या रेषा वा कपाळावरच्या
आठ्या न पाहता आणि व्यक्तीच्या जीवन-मृत्यू वा विवाह-संसार यांच्यापलीकडे
जाऊन समाजाचे, जगरहाटीचे भविष्य रेखाटणारे काही भविष्यशास्त्री जगात आहेत.
त्यापैकी सर्वांत जानेमाने आणि ज्येष्ठ भविष्यशास्त्री म्हणजे ऑलविन टॉफलर.
- बदलते विश्व
(कुमार केतकर)​

Answers

Answered by gnvarshita
0

Explanation:

(कुमार केतकर)

Answered by Ajinkyakadam
0

जानेमाने आणि ज्येष्ठ भविष्यशास्त्री म्हणजे ऑलविन टॉफलर.

- बदलते विश्व

(कुमार

Similar questions