CBSE BOARD X, asked by nandineebaviskar, 1 month ago

माणसा माणसा कधी होशील माणूस? मराठी निबंध​

Answers

Answered by nihaltamboli37
4

Explanation:

आज माणसातला माणूस हरवला आहे ! खराखुरा मानव अस्तंगत झाला आहे. आता उरला आहे फक्त मानवरूपी दानव. आजच्या युगात पावलोपावली आपल्याला मानवाच्या क्रूरतेचा प्रत्यय येतो. आजारी माणूस केवढ्या आशेने आपल्यावर उपचार करून घेत असतो. पण काही वेळा चुकीच्या उपचारांमुळे व अक्षम्य हलगर्जीपणामुळे माणूस मृत्युमुखी पडतो. नेत्रदोष दूर व्हावा म्हणून माणूस नेत्रोपचार करून घेतो; पण काही वेळा औषधातील भेसळ आणि शल्यक्रियेतील हलगर्जीपणा यांमुळे त्याला कायमचे अंधत्व येते. ही भेसळ कोण करतो? अर्थात मानवात दडलेला दानव करतो.

प्रत्येक माणसाने दुसऱ्या माणसाचा विचार करणे, ही झाली माणुसकी. पण आजच्या प्रगत काळातही माणसाची कृती अनेकदा दानवाला लाजवणारी असते. स्वतःला मूल व्हावे, म्हणून अनेक निष्पाप बालकांचा बळी देणारे नरराक्षस आजच्या या विज्ञानयुगातही स्वतःला माणूस म्हणवून कसे घेतात? आपण माणूस असतानाही दुसऱयाला गुलामासारखे राबवणारे जमीनदार, सावकार हे खरोखरीचे माणसाचे शत्रू हेत. 

सत्तास्पर्धेच्या लोभापायी अण्वस्त्रासारख्या भयंकर अस्त्रांची निर्मिती करणारी व लक्षावधी निरपराध लोकांचा क्षणार्धात संहार करणारी ही बड्या राष्ट्रांतील राक्षसी वृत्तीची माणसे सारासार विचार व त्याबरोबर स्वतःमधील माणूसही हरवून बसली आहेत. म्हणून या प्रगत माणसांच्या जगात माणुसकीचा फार मोठा दुष्काळ पडला असावा. अनेकदा माणूस दुसऱ्यास उपदेश करतो; पण स्वतः: तसे आचरण करीत नाही. असा माणूस लोकसेवा कसा करू शकणार? सर्व भेदभाव विसरून माणुसक स्वीकारली तरच मानवधर्माचा विजय होईल.

बहिणाबाईंच्या ओळींतून मानवतेचे किती करुण दर्शन होते पाहा-

' मानसा मानसा कधि व्हशील माणूस

लोभासाठी झाला मानसाचं रे कानूस '.

hope it will help you

Similar questions